अनाथांच्या मुखात चार मानुष्कीचे घास..

अनाथांच्या मुखात चार मानुष्कीचे घास !दर महिन्याला एक दिवस जेवण देण्याचा संकल्पवृद्धाश्रमाही केले व यापुढे करणार अन्नदान सद्गुरु भोजनालय च्या मदतीने संकल्प फाउंडेशनचा उपक्रम …पनवेल दि.04 (वार्ताहर)- सध्या जगातील मानव जात कोरोना या वैश्विक संकटामुळे अडचणीत आहेत. या महामानव मध्ये अनेकांचा मृत्यू झाला. या संकटाच्या काळातही माणुसकी धर्म जपता यावा या भावनेतून कामोठे येथील संकल्प फाउंडेशन ने सद्गुरु भोजनालयाच्या मदतीने अनाथालय आणि वृद्धाश्रमात महिन्यातून एकदा भोजन देण्याचा संकल्प केला आहे. हा उपक्रम सुरु सुद्धा करण्यात आला आहे यामाध्यमातून अनाथ तसेच वृद्धांना चार माणुसकीचे घास देण्याचे समाधान मिळवले जाणार आहे. फाऊडेशनच्या अध्यक्षा वैशाली जगदाळे यांनी मानवतावादी दृष्टिकोन ठेवून पुढाकार घेतला आहे.        गेल्या दीड वर्षांपासून कोरोना हे संकट संपूर्ण जगावर घोंगावत आहे. संपूर्ण मानव जातीला या महामारी रोगाने घेरले आहे. कुटुंबाचे कुटुंब कोरोना ने बाधित झाले आहेत. तर काहींना आपला जीव यामध्ये गमवावा लागला. या आजाराने गरिबाला सोडले नाही तर श्रीमंतांना सुद्धा तारले नाही. कोरोनाविषाणू चे संक्रमण होऊ नये म्हणून राज्य सरकारने सातत्याने टाळेबंदी जाहीर केली. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली. वृद्धाश्रम अनाथालयांच्या मदतीवर त्याचा परिणाम झाला. अनेकांची आर्थिक परिस्थिती खालावल्याने दानत्वाचे हात काही प्रमाणात आखडते झाले. या सर्व गोष्टींचा विचार करून सामाजिक बांधिलकी म्हणून अनाथालय वृद्धाश्रम येथे महिन्यातून किमान एक वेळा जेवण देण्याचा निर्णय संकल्प फाउंडेशन च्या वतीने घेण्यात आला आहे. अर्थात त्याकरता सद्गुरु भोजनालया चे त्यासाठी सहकार्य मिळाले आहे.जेवणाची व्यवस्था  कलापी शिवाजी जाधव यांच्यावर सोपवण्यात आली आहे. वाहतूकीची सोय अपर्णा  मोहिते यांच्याकडून करण्यात आली आहे. राजश्री थोरात, आरती पाटील, राजश्री रणदिवे, अश्विनी लाड  आणि इतर सहकाऱ्यांकडून सहकार्य होत आहे.  या उपक्रमांतर्गत कमल अर्णव  अनाथालय मध्ये जाऊन अन्नदान नुकतेच अन्नदान करण्यात आले. तेथील मुलांना मास्क बिस्किट आणि दूध देण्यात आले. लहानपणीच आई वडिलांचे छत्र हरपलेल्या या निरपराध , निराधार आणि निरागस मुलांना चार  मायेचा घास भरून संकल्प फाउंडेशन आणि सद्गुरु फाउंडेशनने माणूस संकटात असताना खऱ्या अर्थाने माणुसकीचा धर्म निभावला.
चौकटवाहतूक पोलिसांच्या कर्तव्याबद्दल कृतज्ञताकळंबोली वाहतूक शाखेचा पोलीस कर्मचारी रात्रंदिवस वाहतूक नियमनाचे काम करतात. कोरोना  वैश्विक संकटात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांबद्दल संकल्प फाउंडेशन ने खऱ्या अर्थाने कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्यासाठी खास जेवणाचा बेत आखण्यात आला होता. तसेच त्यांना मास्क चे वाटप करण्यात आले. याशिवाय कोरोना योद्ध्यांना ही जेवण देण्यात आले.       

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *