अभय केंद्रातील महिलांना मदतीचा हात

पनवेल, ता. (वार्ताहर) — पनवेल तालुक्यातील अभय केंद्रातील तालुका संरक्षण अधिकारी यांच्या मागणीनुसार पनवेल महापालिकेच्या वतीने गुरुवारी ता. 30 रोजी कामगार महिला व देहविक्री करणाऱ्या महिलांना धान्याचे किट पुरविण्यात आले आहे.

यावेळी तालुका महिला संरक्षण अधिकारी दीप्ती रामरामे, सहाय्यक आयुक्त तेजस्विनी गलांडे यांच्यासह महिला उपस्तित होते.

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी तथा कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात पीडित महिलांसाठी पनवेल तालुका स्तरावर अभय केंद्र संरक्षण अधिकारी कार्यालय स्थापन करण्यात आला आहे. या केंद्राच्या माध्यमातून पीडित महिलांना त्वरित मदत करण्यात येत आहे. सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन व संचारबंदी असल्याने या काळात रोजगार सुटलेल्या या महिलांना धान्य देण्यात यावे अशी मागणी दीप्ती रामरामे यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत. अभय केंद्र पनवेल येथील 18 वर्ष पूर्ण झालेल्या प्रवेशिता व कामगार महिला व देहविक्री करणाऱ्या महिला धान्याचे किट देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *