लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त संत वामनभाऊ भगवानबाबा सेवा मंडळ आणि बाळासाहेब पाटील लोकसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने,अनाथ आश्रमात केले ब्लँकेट वाटप…

लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त संत वामनभाऊ भगवानबाबा सेवा मंडळ आणि बाळासाहेब पाटील लोकसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने,अनाथ आश्रमात केले ब्लँकेट वाटप…

स्व.गोपीनाथ मुंडे साहेब यांनी नेहमीच तळागाळातील गोरगरीब जनतेसाठी संघर्ष केला,त्यांच्या उद्धारासाठी प्रयत्नशील राहिले आणि अश्या सर्वच दीन दलीत शोषित पीडितांसाठी त्यांची ‘मायेची ऊब’ कायम होती;त्याचेच एक प्रतीक म्हणून अनाथ बालकांना मायेची ऊब मिळावी या उद्देशाने भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष श्री विक्रांत जी पाटील आणि पनवेल च्या महापौर डॉ.सौ.कविताताई चौतमोल यांच्या प्रमुख उपस्थितीत हे ब्लँकेट वाटप करण्यात आले.स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांच्या पुण्यतिथी निमित्त श्री विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले,त्याचाच एक भाग म्हणून संत वामनभाऊ भगवानबाबा सेवा मंडळ आणि बाळासाहेब पाटील लोकसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने चीपळे,पनवेल येथील अनाथ आश्रमात बालकांना मोफत ब्लँकेट आणि खाऊ चे वाटप केले गेले.
लॉक डाऊन च्या काळात उबदार भेट मिळाल्याबद्दल लहानग्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून उपस्थित सर्व मान्यवरांचे मन भारावून गेले.
यावेळी पनवेलच्या महापौर सौ. काविताताई चौतमोल, मा.उपमहापौर तथा भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्री विक्रांत पाटील,श्री सुनील जी खाडे,डॉ.राजेंद्र खाडे,मंडळाचे सचिव श्री देविदास जी खेडकर,भटके विमुक्त आघाडीचे उ.रायगड जिल्हा अध्यक्ष श्री बबन बारगजे,भटके विमुक्त आघाडीचे पनवेल शहर अध्यक्ष श्री.गोपीनाथ जी मुंडे,दिलीप नाकडे,विष्णू वायभासे, रामदास नाकाडे,विश्वास वारे व इतर मान्यवर उपस्थित होते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *