अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष अब्दूल रशीद अन्सारी यांनी झूम व्हिडिओ मिटिंगच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले
बुधवार दिनांक २९ एप्रिल २०२० रोजी दुपारी २:३० ते ३:३० यावेळेत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र व मुंबईच्या वतीने राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष हाजी एजाज देशमुख व मुंबई अध्यक्ष वसीम खान यांच्या पदाधिकाऱ्यांची झूम व्हिडिओ मिटिंग घेण्यात आली. मिटिंगच्या माध्यमातून कोरोना वरती मात करणे व आपण गोरगरीब गरजूवंतांसाठी करीत असलेली मदत या सर्व बाबीन वर संवाद साधत सर्व कार्याचा आढावा घेतला.
संवादाचा शेवट करत त्यांनी महाराष्ट्रातील अल्पसंख्याक मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करीत कोरोना नावाच्या महाभयंकर आजारापासून भारत देश मुक्त करू व सर्व जात धर्म बाजूला सारून आम्ही भारतीय आहोत हे ध्यानात ठेवून गोरगरीब पिडीत जनतेची मदत करण्याचे आव्हान केले.तसेच त्यांनी यावेळी बोलताना अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष हाजी एजाज देशमुख व त्यांची सर्व टीम महाराष्ट्रभर व मुंबईतून वसीम खान व त्यांचे सहकारी कोरोनाच्या संकटात सापडलेल्या सर्व लोकांकरिता दिवस-रात्र मदतीचा हात देत आहेत त्या सर्वांचे त्यांनी कौतुक केले.यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष अब्दूल रशीद अन्सारी यांनीही झूम व्हिडिओ मिटिंगच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.