म. न. से चे कार्यध्यक्ष शहर अध्यक्ष शीतल सिलकर यांच्या पुढाकाराने दररोज पोलिसांना डब्बे व गरजू लोकांना जेवण

म. न. से चे कार्यध्यक्ष शहर अध्यक्ष शीतल सिलकर यांच्या पुढाकाराने दररोज पोलीस बांधवांना जेवण पुरविले जात असून या उपक्रमाचे सर्व स्तरातून व पोलीस बांधव ह्या कडून कौतुक होत आहे.

कोरोना विषाणू प्रादुर्भाव आणि त्यामुळे आलेल्या लॉक डाऊन परिस्थितीमुळे मोलमजुरी नागरिकाला आणि त्यांच्या कुटुंबावर व अधिकाऱ्यावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून पनवेल शहर म.न.से चे कार्यकर्ते शहर अध्यक्ष शीतल.च.सिलकर यांच्या मार्गदर्शनाखाली रोज काहींना काही वस्तूंचे वाटप करीत आहे.

येथे दररोज काही ना काही पोलीस बांधवांना तयार जेवण पुरविले जात असून . हे अन्न फॉईल कंटेनरमध्ये पॅक करून व गरजू नागरिकांना अन्नधान्य वाटप हे सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन करून वाटप केले जात आहे. त्यामुळे गरीब गरजू लोकांनाही याचा मोठा दिलासा मिळत आहे.

आता रोज संध्याकाळी पोलिस बांधवाना व गरजू नागरिकांना नाश्त्याचे वाटप करण्यात येत आहे ह्या साठी मोलाचा श्रमदान म्हणून सिद्धेश खानविलकर, प्रीति खानविलकर, संजय मुरकुटे, प्रकाश लाड, संदीप पाटील हे सतत मेहनत घेताना दिसत आहेत ,त्याच सोबत पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पोलीस बांधव सहकार्य देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *