पनवेल तालुका पोलीस ठाण्यातील अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांची घेण्यात येते विशेष काळजी

पनवेल, दि.29 (वार्ताहर) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर गेल्या दिड महिन्यापेक्षा जास्त काळ पोलीस वर्ग 24 तास रस्त्यावर आहे. त्यांच्या आरोग्याची तसेच त्यांच्या कुटुंबियांची काळजी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार हे घेतच आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि अशोक राजपूत यांनी त्यांच्या पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या आरोग्यासाठी वारंवार वेगवेगळ्या उपाय योजना केल्या आहेत.

या अंतर्गत त्यांनी आज पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांचे शरिराचे तापमान मोजण्यासाठी विशेष यंत्र त्याचप्रमाणे रक्तदाब व इतर बाबीं तपासण्यासाठी वेगळी यंत्र सामुग्री पोलीस ठाण्यामध्ये आणली असून त्याद्वारे आता दररोज प्रत्येक अधिकारी व कर्मचार्‍यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार आहे. यापूर्वी सुद्धा वपोनि अशोक राजपूत यांनी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी सॅनिटायझर, मास्क, सेफ्टी गॉगल्स, फेस मास्क, हॅण्डग्लोज सह त्यांच्या कुटुंबियांसाठी जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या होत्या. त्याचप्रमाणे गरज असेल त्या ठिकाणी ग्रामीण भागात ते दररोज जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करीत आहेत. आपल्यासह आपल्या बरोबर काम करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांचे आारोग्य उत्तम रहावे त्यांना कुठल्याही प्रकारे आजार उद्भवू नये याची काळजी वपोनि अशोक राजपूत हे घेत असून बाजारात उपलब्ध असलेले वेगवेगळे आरोग्याची काळजी घेणारे यंत्रसामुग्री ही तात्काळ पोलीस ठाण्यासाठी मागवून घेत आहेत व त्याचा उपयोग करून घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.