पनवेल तालुका पोलिसांनी केली ताडपट्टी मालडुंगे परिसरातील आदिवासी बांधवांना मदत

पनवेल, दि. 28 (वार्तााहर) : तालुक्यातील ताडपट्टी मालडुंगे परिसरातील आदिवासी बांधवांसह विधवा व अपंगांना पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली.

ताडपट्टी मालडुंगे परिसरातील काही आदिवासी बांधवांसह विधवा व अपंगांना अद्यापपर्यंत जीवनावश्यक वस्तू मिळाल्या नसल्याची माहिती पत्रकार संजय कदम यांना मिळताच त्यांनी याबाबत पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि अशोक राजपूत यांच्याकडे ही समस्या मांडली. त्यांनी तातडीने संबंधित बांधवांसाठी नियोजन करून त्या ठिकाणी जीवनावश्यक वस्तू पोलीस हवालदार मंगेश महाडिक, पो. शि. खैरनार, निलेश पाटील आदींच्या पथकांद्वारे सदर ठिकाणी पोहच करून त्याचे वाटप केले. याबद्दल त्यांनी वपोनि अशोक राजपूत व त्यांच्या पथकाचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *