एन आर आय सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मा. श्री. रविंद्र पाटील साहेब यांचा आज वाढदिवस….

पोलिस….. समाजातील एक सेवेकरी

एन आर आय सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मा. श्री. रविंद्र पाटील साहेब यांचा आज वाढदिवस….

सदरक्षणाय खलनिग्रहणाय या समाजाच्या सेवेरूपी रोपट्याच वटवृक्षात रूपांतर होत असताना विविध गुन्ह्यांचा अत्यंत शिताफीने तपास करत गुन्हेगारांना कडक शासन करणे हा त्यांचा हा त्यांचा प्रशासकीय स्वभाव, परंतु या स्वभावाच्या मागेही एक समाजसेवी माणूस दडला आहे हे सरांनी सिद्ध केलं आहे, दोन वर्षांपूर्वी कोरोना सारख्या महामारीत सरांनी केलेली उल्लेखनीय कामगिरी आजही उलवेकरांच्या स्मरणात आहे, या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना नवी मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त यांच्या हस्ते कोरोना योद्धा पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. आजही त्यांनी आपला वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा करत आपली समाजाप्रती असलेली जाणीव त्यांनी दाखवून दिली, याप्रसंगी श्री साई देवस्थान साईनगर वहाळचे संस्थापक अध्यक्ष श्री. रविंद्र का. पाटील,पोलीस उपनिरीक्षक इंगळे साहेब,धनाजी पाटील, रोटरी उलवेचे अध्यक्ष शिरीष कडू, वितेश म्हात्रे यांच्या वतीने अश्या कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्यास म्हणजेच मा.श्री. रविंद्र पाटील सर यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा🌹🌹

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *