राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा.

आजाद समाज पार्टी.
महाराष्ट्र प्रदेश.
महिला मोर्चा आयोजित ,

राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा. अंतर्गत

    *🎤 खुला आजाद मंच.🎙️* 

           🔘🟢🟣🔵🔘

प्रिय क्रांतीसाथी,
जयभीम…. जय भीम आर्मी.
जय आजाद समाज पार्टी.
आपणास कळविण्यात अत्यानंद होत आहे की , २६ मे रोजी झालेल्या महान बुद्ध पौर्णिमेच्या महद पवित्र दिनाचे औचित्य साधून , आजाद समाज पार्टी , महाराष्ट्र राज्य महिला मोर्चा यांचे विद्यमाने उद्याचा स्वाभिमानी आंबेडकरी कार्यकर्ता-नेता घडविण्यासाठी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे महा आयोजन केले असून , आंबेडकरी विचारधारेतील , आपल्या वयाची ०७ वर्ष पूर्ण झालेल्या हरएक व्यक्तीने ह्या अभिनव स्पर्धेत आपला अनमोल असा सहभाग नोंदवावा.
✍️समाजरक्षिका मा.नेहाताई शिंदे.
राज्यप्रमुख , ASP महिला मोर्चा.

🔘स्पर्धेचा कालावधी २६ मे ते ०५ जून.🔘

बालगट:- -वयोमर्यादा ७ ते १२ वर्ष.
वेळ सुमारे ०५ मिनिटे.
किशोरगट:- वयोमर्यादा १३ ते १७ वर्ष.
वेळ सुमारे ०७मिनिटे
खूलागट:- १८ वर्षा पुढील सर्व.
वेळ सुमारे १०मिनिटे.
प्रथम क्रमांक :-
१०००/₹, ट्राॅफी आणि प्रशस्तीपत्रक.

द्वितीय क्रमांक :-
५००/₹, ट्राॅफी आणि प्रशस्तीपत्रक.

तृतीय क्रमांक :-
२५०/₹, ट्राॅफी आणि प्रशस्तीपत्रक

🔘उत्तेजनार्थ १०० विजेत्यांना प्रशस्तीपत्रके.

📱व्हिडिओ पाठवण्याचे नियम.🖥️
🔵 व्हिडिओ पाठवण्यासाठी आपापल्या गटातील निश्चित केल्या गेलेल्या वेळमर्यादेइतकीच व्हिडिओची वेळ असायला हवी.

🟣 व्हिडिओ पाठवताना स्पर्धकांनी आपले नाव, गट, रहाण्याचे ठिकाण, नंबर इत्यादी सह, आपल्या विषयाचे नाव टाकणे अत्यावश्यक आहे.

🟢 दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ असणारे व्हिडीओज स्पर्धेतून बाद केले जातील.

🔵 व्हिडिओ मध्ये आवाज क्लिअर नसल्यास तो व्हिडिओ स्पर्धेतून आपोआपच बाद होईल.

🟣 पाच जून नंतर आलेले व्हिडिओ हे स्पर्धेसाठी , कुठल्याही कारणास्तव ग्राह्य धरले जाणार नाहीत.

🟢 विजेत्यांच्या व्हिडिओना आजाद समाज पार्टी च्या सर्व वेब पेज, राष्ट्रीय यु ट्युब चॅनल तसेच, महाराष्ट्रातील वृत्तपत्रात बातम्यांमधून प्रसिद्धी दिली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *