शांतिवन कुष्ठरूग्ण वॉर्डसाठी वॉशिंग मशिन भेट..

शांतिवन कुष्ठरूग्ण वॉर्डसाठी वॉशिंग मशिन भेट
पनवेल, दि.28 (वार्ताहर) ः पनवेल तालुक्यातील नेरे जवळील कुष्ठरोग निवारण समिती शांतिवन येथील कुष्ठरुग्ण वॉर्डसाठी पनवेल मधील हर्षल रविकांत राईरकर यांनी संस्थेची गरज ओळखून वॉशिंग मशिन भेट दिली.
या मशिनचा उपयोग पुरुष व महिला निवासी वॉर्ड मधील चादरी, बेडशिट, पडदे आणि कपडे धुण्यासाठी होईल. यामुळे तेथील कार्यकर्त्यांना कपडे धुण्याचा त्रास होणार नाही तसेच वेळ व श्रमाची बचत होईल. वॉशिंग मशिन भेट देताना राजन साखरकर, गणेश दांडेकर हे उपस्थित होते. संस्थेच्या अध्यक्षा रक्षा मेहता यांच्या सुचनेनुसार संस्थेच्या कुष्ठरुग्ण वॉर्ड व दवाखान्यासाठी आता पुन्हा संस्थेच्या कामासाठी दर बुधवारी डॉ. प्रणित गोगटे येत आहेत त्यामुळे कुष्ठरुग्णांना आता बरे वाटत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *