छावा क्रांतिवीर सेना रायगड जिल्हाध्यक्ष पदी सुनील पाटील यांची निवड तर कार्यकारणी जाहीर..

छावा क्रांतिवीर सेना रायगड जिल्हाध्यक्ष पदी सुनील पाटील यांची निवड तर कार्यकारणी जाहीर
पनवेल (प्रतिनिधी) महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट तेरावे वंशज श्रीमंत छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले महाराज यांच्या नावाने व आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात छावा क्रांतिवीर सेना महाराष्ट्र राज्य ही संस्था कार्यरत आहे सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा क्षेत्रात काम करणारी संघटना व अन्यायाविरुद्ध लढणारी गोरगरीब जनतेच्या न्याय मिळवून देणारी तसेच बारा बलुतेदारांना सोबत घेऊन जाणारी ही संघटना मोठ्या जोमाने महाराष्ट्रभर कार्यरत आहे
दैनिक आजचा महाराष्ट्राचे पत्रकार साप्ताहिक वेध विकासाचे संपादक सुनील पाटील भातान यांची छावा क्रांतिवीर सेना महाराष्ट्र राज्य रजिस्टर नंबर ११४९/२०१६ रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली.केंद्रीय अध्यक्ष प्रतापसिंह कांचन पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. या संघटनेत आपण माझ्यावर ही अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली ती पूर्णपणे पार पाडण्यासाठी मी तत्पर राहीन नागरिकांच्या न्यायहक्कासाठी अडीअडचणी सोडविण्याचे काम करणार असून संघटनेमधील सर्व पदाधिकारी यांना सोबत घेऊन जनहितासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे यावेळी सुनील पाटील म्हणाले .

यावेळी रायगड जिल्हा संपर्कप्रमुख विजय (बंड्या) ठोसर कार्याध्यक्ष म्हणून नितीन पाटील उपाध्यक्ष संकेत भोईर सचिव राजेश दरेकर उपअध्यक्ष कमलाकर बोराडे उपद्यक्ष रजनीकांत पावली खजिनदार सुमित जाधव सहसचिव चंद्रकांत गावंडे सदस्य संतोष पाटिल रायगड जिल्हा कार्यकारणी जाहीर करून नियुक्तीपत्र देण्यात आले.तसेच यावेळी पनवेल जिल्हा कार्यकारिणीची देखील निवड करण्यात आली यामध्ये पनवेल जिल्हा अध्यक्ष म्हणून प्रसाद परब यांची निवड करण्यात आली

यावेळी केंद्रीय अध्यक्ष प्रतापसिंह कांचन पाटील , महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील , पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गोपाळ घारे , कोकण विभागीय कार्याध्यक्ष धनंजय घरत. ज्येष्ठ पत्रकार रायगड जिल्हा कार्यकारिणीचे मार्गदर्शक देविदास गायकवाड पनवेल तालुका अध्यक्ष अनिकेत पाटील उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *