खांदा कॉलनी मध्ये पाणी टंचाई, शिवसेनेची धडक कारवाई..

खांदा कॉलनी मध्ये पाणी टंचाई, शिवसेनेची धडक कारवाई

आज खांदा कॉलनी मधील जनतेला भेडसावत असलेल्या पाणी प्रश्नावर शिवसेना खांदा कॉलनी शहर प्रमुख श्री. सदानंद शिर्के साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज सिडको आणि महाराष्ट्र जीवनप्राधिकरण च्या कार्यालय धडक दिली. या वेळी सिडकोचे सहाय्यक अभियंता श्री. राहुल सरोदे आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे सहाय्यक अभियंता श्री. अर्जुन गोळे यांना खांदा कॉलनी मधील पाणी प्रश्नावर जाब विचारला त्याच बरोबर mjp च्या लाईन ला लागलेले गळतीचे ग्रहण कधी दूर होणार असे अनेक प्रश्न शिवसेनेच्या शिष्टमंडळाने विचारले. त्याचबरोबर खांदा कॉलनी मधील काही सोसायट्याना पाणी टंचाई असल्याने त्यांना टँकर द्वारे आज पाणी पुरवठा शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आला. यावेळेस आपण लवकरात लवकर पाणी प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दोन्ही अधिकाऱ्यांनी दिले. यावेळी उपशहर प्रमुख श्री. दत्तात्रेय महामुलकर, उपशहर प्रमुख श्री. संपत सुवर्णा, उपविधानसभा अधिकारी कु. सुशांत सावंत, उपशहर संघटक श्री. प्रकाश वानखेडे, उपशहर संघटक श्री. संजीव गमरे, उपविभाग प्रमुख श्री. चंद्रगुप्त साळवी, उपविभाग संघटक श्री. सुनिल महामुनी, उपकार्यालय प्रमुख श्री. नागम सर, शाखाप्रमुख श्री. मंगेश पवार, उपशाखाप्रमुख श्री. भास्कर साळवी, उपशाखाप्रमुख श्री. गणेश साबळे,गट प्रमुख श्री. सुवरे शाखा अधिकारी कु. सौरभ महामुलकर, शाखा अधिकारी श्री. ऋषिकेश घुले, जेष्ठ शिवसैनिक श्री. प्रकाश घाडीगावकर, प्रबोधन सोसायटीचे सदस्य श्री. बाबासाहेब शिंदे, श्री. मंगेश घुरण. श्री. विनायक मोरे, श्री. प्रदीप माने व शिवसैनिक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *