पनवेल परिरसात दागिने खेचून पसार झाल्याच्या दोन घटनांमुळे महिला वर्गात भीतीयुक्त वातावरण.

पनवेल परिरसात दागिने खेचून पसार झाल्याच्या दोन घटनांमुळे महिला वर्गात भीतीयुक्त वातावरण।पनवेल दि.27 (संजय कदम): पनवेल शहर परिसरात दोन वेगवेगळ्या घटनेत दुचाकी गाडीवरून आलेल्या अज्ञात इसमांनी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व चेन असा लाखोंचा ऐवज खेचून चोरून नेल्याने पनवेल परिसरातील महिलांमध्ये भीतीयुक्त वातावरण आहे.
श्रीमती सुनिता चौधरी (वय-52) या सकाळच्या वेळेस पटेल हॉस्पिटलकडून भाऊराव पाटील चौकाकडे जात असताना एका अनोळखी स्कूटी चालकाने त्यांच्या गळ्यातील 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून घेऊन तो पसार झाला आहे. त्याची किंमत जवळपास 80 हजार इतकी आहे. तर दुसऱ्या घटनेत कविता वैती या रोहिदास वाडा येथील त्यांच्या घरासमोर पाणी भरत असताना एका अनोळखी इसमाने त्यांच्या गळ्यातील 10 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन त्याची किंमत जवळपास 25 हजार इतकी आहे. तीखेचून घेऊन तो पसार झाला आहे. या दोन्ही घटनेची नोंद पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.