मोबाईल खेचून मोटार सायकलवरुन पसार..

Panvel-Varta-Logoमोबाईल खेचून मोटार सायकलवरुन पसार
पनवेल, दि.26 (वार्ताहर) ः अनोळखी इसमांनी एका इसमास आईला फोन दाखविण्याचा बहाणा करून त्याच्या हातातून मोबाईल फोन हिसकावून त्याला धक्का देवून मोटार सायकलवरुन पसार झाल्याची घटना खारघर जवळील खुटुकबंधन येथे घडली आहे.
फिर्यादी रजनीस चौरसिया याचा लहान भाऊ विकास याच्याकडे मोटार साायकलवरुन अनोळखी इसम येवून माझ्या आईला फोन दाखविण्याचा बहाणा करून त्याच्याजवळ असलेले जवळपास 32 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल फोन त्याच्याकडून हिसकावून घेेवून त्याला धक्का देवून मोटार सायकलवरुन पसार झाले आहेत. याबाबतची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

मंगळसूत्र खेचून दोघेजण पसार
पनवेल, दि.26 (संजय कदम) ः पायी जात असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून तेथे आलेले दोघेजण पसार झाल्याची घटना खारघर वसाहतीमध्ये घडली आहे.
मालती दुबे (59) या सकाळच्या वेळी हिराई क्लिनिकच्या समोरील रस्त्यावरुन पायी जात असताना समोरुन चालत आलेल्या अनोळखी इसमाने त्यांच्या जवळ येवून त्यांच्या गळ्यातील जवळपास 35 हजार रुपयाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून त्याच्या मित्राशी संगनमत करून ते दोघे पसार झाले आहेत. याबाबतची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *