मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या तर्फे गरजू रिक्षा चालकांना जीवनावश्यक वास्तूंचे वाटप करण्यात आले..

मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या तर्फे गरजू रिक्षा चालकांना जीवनावश्यक वास्तूंचे वाटप करण्यात आले
कोरोना काळात लॉक डाऊनमुळे सामान्य लोकांचे आर्थिक गणित बिघडत चालले आहे त्यात रोज कमाई करून खाणाऱ्या लोकांचे आणि रिक्षा चालकांची तर परिस्थिती आणखीन बिकट आहे.या परिस्थितीचा गांभिर्याने विचार करत नगरसेवक विक्रांत पाटील आणि कोठारी फौंडेशन यांच्या वतीने प्रभाग क्र १८ मधील गरजू रिक्षा चालकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या जनसेवा कार्यालय जवळ करण्यात आले.महाराष्ट्र सरकार ने घोषणा करूनही रिक्षा चालकांना कोणतीही मदत अद्यापही मिळाली नाही पण नगरसेवक विक्रांत पाटील यांनी योग्यवेळी मदत केल्याबद्दल जमलेल्या सर्व रिक्षा चालकांनी आभार मानले.माझ्या प्रभागाच्या समस्या सोडवण्यासाठी मी नेहमीच तत्पर असतो पण सध्या लॉक डाऊनमुळे रिक्षा चालकांना धंदा ही मंदावला आहे काही लोक घरी बसले आहेत अशा माझ्या प्रभागातील रिक्षा चालकांना मदत करणे हे माझे परम कर्तव्य समझतो तसेच यापुढेही हे समाजकार्य असेच पुढे चालू राहील असे मनोगत नगरसेवक विक्रांत पाटील यांनी व्यक्त केले.यावेळी भाजयुमो प्रिंट मीडिया सेल आणि कोठारी फौंडेशन चे विमलकुमार जैन,निलेश नाईक,निलेश देशमुख आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *