फ्रँटलाइन किवर्कर्स म्हणून मर्चंट नेव्ही आणि क्रुज सिफररर्स ला प्राधान्याने लस मिळावी..

“श्रमिक सुरक्षा परमो धर्म:”
फ्रँटलाइन किवर्कर्स म्हणून मर्चंट नेव्ही आणि क्रुज सिफररर्स ला प्राधान्याने लस मिळावी

पनवेल दि.१९ (वार्ताहर)- ऑल इंडिया सिफररर्स अँड जनरल वर्कर्स यूनियन च्या अथक प्रयत्नाना यश आले, ये आपण आता तरी बोलू शकतो पण ह्याची सुरुवात काही महिन्यांपूर्वी झाली होती. या वैश्विक महामारीच्या काळात जे देश विदेशातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते तेव्हा सुद्धा न थांबता न थकता आपले कार्य प्रामाणिक पणे चालू ठेवणारे हे सिफेररर्स होते. वैद्यकीय मदत, पिण्याचे पाणी, अन्नधान्य आणि इतर जीवन आवश्यक वस्तु पूर्ण जगभर पोचवण्याचे मोलाचे काम यांनी केले. त्यांच्या या कार्याचे जगभरातून कौतुक झाले, त्यांना सन्मान देण्यात आला आणि त्यांना जीवनावश्यक सेवा कर्मचारी म्हणजेच ईसेनशीयल कीवर्कर्स किंवा फ्रँटलाइन किवर्कर्स म्हणून जगभर मान्यता मिळाली. यूनियनने काळाची गरज लक्षात घेत कोरोना प्रतिबंधनात्मक लस प्राधान्याने सिफररर्सना मिळावी अशी मागणी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. आणि वारंवार त्या संबंधी चे पत्रव्यवहार यूनियन चे अध्यक्ष संजय वासुदेव पवार यांच्या मार्गदर्शनाने शिपिंग मंत्रालय आणि डी जी शिपिंग कडे सुद्धा करण्यात आले.
डी जी शिपिंग कडून या संबंधीचे पत्रक काढण्यात आले. तरी यात बराच कालावधी गेला. मार्च मध्ये जेव्हा पुन्हा एकदा कोरोना ने पुन्हा एकदा भारतात हातपाय पसरले तेव्हा जगभरातील बऱ्याच शिपिंग कंपन्यांनी त्यांचे धोरण स्पष्ट केले “नो व्याकसिनेशन नो जॉब”. यामुळे भारतीय सिफररर्स च्या नोकरीवर गदा येत होती. तेव्हा यूनियन कार्यध्यक्ष अभिजीत सांगळे यांनी आपला लासिकरणाचा लढा वेगाने पुढे चालूच ठेवला. अजून काही पत्रक काढण्यात आले, पण केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात सुसूत्रता नसल्या मुळे महाराष्ट्रात तशी सुविधा लागू करण्यात तांत्रिक अडचणी दूर करून तातडीने लसीकरण करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीण्यात आले. आत्ता डी जी शिपिंग कडून सांगण्यात आल्या प्रमाणे संपूर्ण भारतात १२ मोठ्या बंदरांवर हॉस्पिटल्स मध्ये लस घेता येण शक्य झाले आहे.
तसेच लासिकरणासाठी जी नाव नोंदणी करायची होती त्यातही तांत्रिक अडचणी प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यात आले. व त्यावर योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या. यूनियनला या संबंधी सतत कॉल्स येतात यात प्रामुख्याने मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार व हरियाणा यांचा समावेश आहे कारण त्याच्या राज्यात कोणतंही बंदर नसल्याने तेथील कोणतीच हॉस्पिटल्स प्राप्त यादी मध्ये नव्हते. तसेच गुजरात, आंध्रप्रदेश, तामिळनाडू इथे मोठया प्रमाणात सिफररर्स असलेल्या राज्यात फक्त एक लसीकरण केंद्र दिल्याने सिफररर्स कडून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते, यूनियन तर्फे याबाबतीत उपाययोजना सुचवल्या आहेत त्यात प्रामुख्याने, कॅम्प घेणे आणि ड्राइव इन लसीकरण करावे. रोज पाच सिफररर्सचे लसीकरण यूनियन च्या मदतीने केले जाते, हे प्रमाण फार कमी आहे पण यात नक्कीच वाढ होईल असा विश्वास ऑल इंडिया सिफररर्स अँड जनरल वर्कर्स यूनियन कडून देतो, आम्ही आमच्या सिफररर्सच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध होतो, आहोत आणि नेहमीच राहू, आमचे ब्रीद वाक्य आहे “श्रमिक सुरक्षा परमो धर्म:” आमचा धर्म आम्ही कधीच सोडणार नाही, अशी ठाम भूमिका संजय वासुदेव पवार यांनी मांडली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *