एमजीएम रुग्णालयातील प्लाजमा लॅब सुरू करा.

एमजीएम रुग्णालयातील प्लाजमा लॅब सुरू करण्याची राजेश केणी यांची मागणीपनवेल दि.16 (संजय कदम): पनवेल परिसरातील नागरिकांना प्लाझ्मा दान करण्यासाठी नवी मुंबई, ठाणे परिसरात जावे लागते. त्यामुळे कामोठे येथील एमजीएम रुग्णालयातील प्लाझ्मा लॅब सुरू करण्याची मागणी शेकापक्षाचे तालुका चिटणीस राजेश केणी यांनी रुग्णालयाकडे केली आहे.       कोरोना या महारोगाने संपूर्ण देशात थैमान घातला आहे. त्या अनुषंगाने या रोगाशी सामना करण्यासाठी सध्या अनेक प्रकारच्या उपकरणांची कमतरता भासत आहे. कोरोना झालेल्या रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपी उपयुक्त ठरत आहे. पनवेल परिसरात प्लाझ्मा लॅब नसल्यामुळे प्लाझ्मा दान करणाऱ्यांना नवी मुंबई, मुंबई, ठाणे अशा ठिकाणी जावे लागत आहे. कामोठे एमजीएम रुग्णालयातील प्लाझ्मा लॅब काही दिवसांपूर्वी सुरू होती. मात्र ती सद्यस्थितीत बंद असल्याचे समजते. प्लाझ्मा अभावी काही रुग्णांना मृत्यूला सामोरे जावे लागते. पनवेल तालुक्यात आणि महानगरपालिका हद्दीत कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आहेत. त्यामुळे एमजीएम रुग्णालय कामोठे येथील प्लाझ्मा लॅब लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस राजेश केणी यांनी रुग्णालयाला निवेदन देऊन केली आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *