कार्यसम्राट नगरसेवक राजू सोनी यांच्या माध्यमातून पनवेल परिसरातील मान्सूनपूर्व साफसफाई कामाला सुरवात..

कार्यसम्राट नगरसेवक राजू सोनी यांच्या माध्यमातून पनवेल परिसरातील मान्सूनपूर्व साफसफाई कामाला सुरवातपनवेल दि.16 (संजय कदम)- पनवेल महानगरपालिकेचे कार्यसम्राट नगरसेवकराजू सोनी यांच्या माध्यमातून प्रभाग क्र.-19 तसेच इतर विभागातील नाले, गटारे, रस्ते दुरूस्ती, डागडुजी, झाकणे लावणे आदी विविध प्रकारच्यामान्सूनपूर्व कामांना सुरवात करण्यात आली आहे.
           पावसाळा तोंडावर आला असताना अनेक ठिकाणी नाले व गटारे तुंबलेली आहेत. तसेच काही ठिकाणी गटारांचा काही भाग तुटलेला आहे. त्यामुळे रस्त्यावर पाणी पसरते. काही ठिकाणी झाकणे तुटलेली आहेत. तसेच औषध फवारणी, पावडर फवारणी आदी बाबातच्या तक्रारी नागरिकांनी कार्यसम्राट नगरसेवक राजू सोनी यांच्याकडे करताच पनवेल महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी शैलेश गायकवाड यांची मदत घेऊन सफाई व कर्मचाऱ्यांच्या साथीने त्यांच्या प्रभागासह ज्या ठिकाणांहून तक्रारी येत आहेत त्याठिकाणी तत्काळ पोचून तेथील परिसर स्वच्छ करून दिला जात आहे. अनेकवेळा ते स्व खर्चाने व स्वतः खाजगी कामगार लावून ही रेंगाळलेली कामे युद्धपातळीवर करून घेत आहेत. त्याबद्दल पनवेलकर राजू सोनी यांचे कौतुक करीत आहेत.           

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *