पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील अधिकारी/कर्मचारी यांची कामाच्या ठिकानी व्यवस्था व्हावी, मनपा नगरसेविका सौ. दर्शना भगवान भोईर ह्यांनी केली मागणी

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या शासकीय व खाजगी आस्थापना मधील अधिकारी/कर्मचारी यांची कामाच्या ठिकणा जवळ व्यवस्था करणेकरीता आदेश होण्यास मनपा नगरसेविका सौ . दर्शना भगवान भोईर ह्यांनी पत्राद्वारे मनपा आयुक्तांना केली मागणी.

पणवेल महानगरपालिका क्षेत्र व त्या सभोवतालच्या ग्रामीण भाग यामधील कोरोना रुग्णांची संख्या ५० च्या उंबरठ्यावर पोहचलेली असून, सदरील कोरोना व्हायरस चे संक्रमन रोखण्याकरिता राज्यशासन व राज्यशासनाच्या विविध शाखा शर्थीचे प्रयत्न करीत असून, या करिता राज्य व केंद्र शासनाकडून लोकडाऊन चा अवलंब केलेला असून, सर्व सामान्य नागरिकही या लोकडाऊन नियमांचे पालन करताना दिसून येत आहे.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना ची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येचा विचार केल्यास असे निदर्शनास येते की, जे नागरिक पनवेल महानगरपालिका क्षेत्रात वास्तव्यस असलेले, परंतु, नोकरी व कामाच्या निमित्ताने मुंबई, नवी मुंबई व तत्सम क्षेत्रातील अनेक कर्मचारी सध्या अत्यावश्यक सेवा पुरवीत आहेत, त्यामध्ये डॉक्टर, नर्सेस, सफाई कामगार, सीआयएफ जवान याचं प्रामुख्याने समावेश असून यापैकीच काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालेली असल्याने त्यांच्या संपर्कात येऊन त्यांचे नातेवाईक व इतर नागरिकही बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे या ठिकानी वास्तव्यास असलेल्या नागरिकाच्या मध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रातील कोरोना बाधित रुग्णाच्या संख्येवर यशस्वीपणे पायबंध घालण्याकरिता उक्त उल्लेखित अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची त्यांचा कामच्या ठिकानाजवल होटेल, हॉस्टेल आशा ठिकाणी व्यवस्था करण्याची आदेश देण्यात यावेत जेणेकरून यामुळे सदरील कोरोना संक्रमण थांबून प्रशासनासमोरील मोठे अवाहन टळून, सदरील रुग्णाची संख्या कमी होन्यास मदत होईल संबंधितांना तातडीने द्यावेत अन्यथा संबंधितावर दांडात्मक कार्यवाही करण्यात यावी, ही विंनती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *