संवेदना चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देणार-संस्थापिका / अध्यक्षाकोमल खोचरे (तावरे)

संवेदना चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देणार-संस्थापिका / अध्यक्षाकोमल खोचरे (तावरे)
पनवेल दि.14 (संजय कदम)- आज अक्षय तृतीया, धर्मवीर संभाजी राजे जयंती आणि रमझान ईद च्या पवित्र दिनी केएन फाऊंडेशन हे नाव बदलून संवेदना चॅरिटेबल ट्रस्ट या आमच्या नवीन संघटनेचे, संस्थेचे लोकार्पण करत आहोत. या माध्यमातूनतळागाळातील लोकांना न्याय मिळवून देणार असल्याची माहिती संस्थापिका / अध्यक्षाकोमल खोचरे (तावरे) यांनी दिली आहे.
        सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, बौद्धिक इ. क्षेत्रांत लोककल्याणार्थ कार्यरत असलेली ही एक सेवाभावी संस्था असणार आहे. या संस्थांच्या संघटना एका विशिष्ट हेतूने व उद्दिष्टासाठी केलेली आहे आणि त्यांत काम करणारे स्वयंसेवक स्वेच्छेने व निःस्वार्थीपणे कोणतेही काम व मदत करण्यास तत्पर असतील. आमची संघटना प्रामुख्याने नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींत सापडलेल्यांना साहाय्य करणार आहे व प्रसंगोपात्त आर्थिक मदतही आम्ही गरजू व्यक्तींना करू. यांशिवाय लोकांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देऊन, नागरी सुविधांबद्दल जागरूक, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास साहाय्य करणे तसेच अन्य अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करण्याचे काम आम्ही या संघटनेच्या मार्फत करणार आहोत आणि समाजात घाटीत अघटित अन्यायाच्या विरोधात देखील आम्ही तत्परतेने आवाज उठवू आणि लोकांना न्याय मिळवून देऊ. तरी आपल्या सर्वांचा आशीर्वाद आणि साथ आमच्या या संघटनेच्या सोबत असू द्या हीच मी जनतेकडे प्रार्थना करीत असल्याचेसंस्थापिका / अध्यक्षाकोमल खोचरे (तावरे) यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *