केएन फाऊंडेशनच्या माध्यमातून मजूरांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

केएन फाऊंडेशनच्या माध्यमातून मजूरांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पनवेल, दि.11 (वार्ताहर) ः कोरोनाच्या जागतिक संकटामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे प्रतिबंध म्हणून संपूर्ण देशात लोक डाऊन हा पर्याय निवडला आहे. त्यामुळे व्यवसाय ठप्प पडले आहे रोज मजुरी करणारे कुटुंब विस्कळीत कुटुंब यांच्यावरती उपासमारीची वेळ आली आहे. याच पार्श्‍वभूमीवर के न फाउंडेशन आणि त्यांचे संस्थापक कोमल सुरज खोचरे उर्फ (तावरे )  यांनी काही गरजूंना अन्नधान्य किट आणि जीवनावश्यक वस्तू यांचे वाटप केले.
कोरोना वर विजय मिळवून सगळे घरी सुरक्षित राहू अशा संदेश आणि जनजागृती करण्यात आली तसेच के एन फाउंडेशन आणि त्यांची टीम राजेंद्र तावरे, उझेफ शेख ,संदीप वर्मा पुष्पा काळे ,सतीश पवार सचिन गोरे,अक्षता बेलनकर उर्मिला वर्मा ,किरण तावरे,सोमनाथ तावरे,योगेश खुजे या सर्वांनी खूप मोलाची साथ दिली तसेच ए के फाउंडेशन संस्था आणि त्यांचे संस्थापक अंकुश कांबळे यांनीही त्यांच्याप्रमाणे हातभार लावला, संजय सावंत हरीश कांबळे, मनीष कांबळे ,सूर्यकांत कांबळे ,योगेश केणी सुभाष सोनवणे , सोहील नाईक ,प्रणय जाधव ह्यांचा  साहाय्याने जीवन आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले केएन फाऊंडेशन आणि त्यांचा संस्थपिका कोमल सुरज खोचरे (तावरे) आशा च गरजू लोकांसाठी काम करतील आणि त्यांना आधार देतील ,त्यांचा ह्या कार्याला करू तितके कौतुक कमी आहे ,ह्या काळात सुद्धा स्वतः बारकाईने लक्ष्य देऊन लोकांना मदत करतायत.एक हात मदतीचा, लोक सेवा हीच ईश्‍वर सेवा मानून ते आज जनतेची सेवा करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *