24 तास कर्तव्यावर असलेल्या पोलिस बांधवांची पोटाची भूक भागवतेय शाम देवी माता ट्रस्ट

पनवेल, दि.26 (वार्ताहर): कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे लॉकडाऊनच्या काळात पोलिस बांधवांना 24 तास आपल्या कुटूंबियांपासून दूर राहून वेगवेगळ्या ठिकाणी कर्तव्य बजवावे लागत आहे. अशा बांधवांच्या मदतीला कामोठे येथील शाम देवी माता ट्रस्ट धावून गेली असून त्यांच्या पोटाची भूक भागविण्याचे काम ही ट्रस्ट गेल्या दिड महिन्यांपासून करीत आहे.

शाम देवी माता ट्रस्टचे अध्यक्ष विजय पाल, सिद्धू कांबळे, धर्मेंद्र शर्मा, दिलीप पाल, शर्मेश राठोड, अनिल शुक्ला, रणजित सोनी, सागर गरजे, बहादूर सिंग आदी समाजप्रेमी सातत्याने गेल्या दिड महिन्यांपासून कामोठे पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी चांगल्या पद्धतीचे जेवण देत आहे. त्याचप्रमाणे कळंबोली आरटीओ कार्यालय, खांदेश्वर पोलिस ठाणे यांनासुद्धा त्यांच्या मार्फत जेवण देण्यात येत आहे. त्यामध्ये दोन प्रकारच्या भाज्या, वरण भात, पुरी, पापड, लोणचे व एक गोड पदार्थ नेहमी असतो. ही सेवा करीत असताना गरजवंतांनासुद्धा त्यांच्या मार्फत जेवण देण्यात येत आहे. तसेच आत्तापर्यंत त्यांनी 200 च्या वर कुटूंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. व हि सेवा पूर्ण लॉकडाऊन उठेपर्यंत करत राहणार असल्याची माहिती शाम देवी माता ट्रस्टचे अध्यक्ष विजय पाल यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *