युसूफ मेहेरअली सेंटरच्या वतीने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जन जागृती.

युसूफ मेहेरअली सेंटरच्या वतीने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जन जागृती
पनवेल, दि.10 (वार्ताहर): कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ग्रामीण तसेच आदिवासी भागामध्ये अनेक अफवा पसरत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे रायगड जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांनी लोकजागृतीसाठी पुढे येऊन सहकार्य करावे असे  आवाहन रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले होते या अवाहनाला प्रतिसाद देत मागील साठ वर्षे रायगड जिल्ह्यात ग्रामीण विकासाचे  काम करणाऱ्या पनवेल तालुक्यातील युसूफ मेहेरअली सेंटरचे प्रकल्प संचालक सुरेश रासम यांच्या पुढाकाराने पनवेल तालुक्यातील पळस्पे, तुरामले, सांगूरली, शिरढोन, चिरवत, चिंचवन, कल्हे, बांधनवाडी, तारा, डोलघर, बारापाडा, दिघाटी, साई, कासारभाट तर पेण तालुक्यातील खारपाडा, रावे, खरोशी, दुरशेत, बळवली, शितोळे वाडी, गोविर्ले, हमरापूर, तांबदशेत,जोहे, कळवे, दादर, वरेडी या गावांसह आजूबाजूच्या आदिवासी वाड्यात जाऊन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जन जागृती करण्यात येत आहे सेंटरच्या सामाजिक कार्यकर्त्या मालती म्हात्रे,संतोष ठाकूर, तेजस चव्हाण, अंकूश जाधव, रहेमान शेख, बाळकृष्ण सावंत, हरिश्चंद्र वाघे, संतोष ठाकूर, रामदास गुरमे, संतोष हापसे आणि देविदास पाटील यांच्यासह इतर कार्यकर्ते पेण तालुक्यातील गावांमध्ये जाऊन कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनाची माहिती देत , कोरोना संक्रमण रोखण्यासाठी नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी आणि  लसीकरणासाठी ‘कोविन, आरोग्य सेतू आणि उमंग या एप्लिकेशन द्वारे नोंदणीची माहीती देत आहेत दरम्यान हे कार्यकर्ते जोहे गावात पोहोचल्यानंतर स्थानिक सामाजिक कार्यकर्ते नरेश मोकल आणि ग्रामपंचायत जोहेच्या सरपंच सौ. जयवंती पाटील यांनी ह्या प्रत्यक्ष मोहिमेत सहभाग देत जनजागृती करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *