कळंबोली वसाहतीमध्ये कोव्हीड लसीकरण केंद्र सुरू करण्याची नगरसेवक रवींद्र भगत यांची मागणी

कळंबोली वसाहतीमध्ये कोव्हीड लसीकरण केंद्र सुरू करण्याची नगरसेवक रवींद्र भगत यांची मागणी
पनवेल, दि.10 (संजय कदम) ः कळंबोली वसाहतीमध्ये कोव्हीड लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे नगरसेवक रवींद्र भगत यांनी केली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कळंबोलीमध्ये जेष्ठ नागरिकांसाठी व इतर नागरिकांसाठी दोन ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करण्यात यावे. त्याठिकाणी जेष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था व मंडप व अतिरिक्त मनुष्य बळ लागल्यास आम्ही  स्वतः पुरविण्यास तयार आहोत. तरी सदर जनसंपर्क कार्यालय पत्ता केएल 5 से.3 ई , बिल्डींग नं 10, शॉप नं 01 / जनसंपर्क कार्यालय पत्ता से .1 ई , तिरुपती सोसायटी शॉप नं 25 याठिकाणी नागरिकांसाठी कोव्हिड लसीकरण सुरु करण्यात यावे., अशी मागणी त्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *