गुन्हे शाखा कक्ष-2च्या धडक कारवाईत देशी विदेशी मद्यसाठा हस्तगत.
गुन्हे शाखा कक्ष-2च्या धडक कारवाईत देशी विदेशी मद्यसाठा हस्तगत.पनवेल दि.09 (वार्ताहर)- पनवेल तालुक्यातील कसळखंड या ठिकाणीगुन्हे शाखा कक्ष-2 च्या पथकाने टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात देशी विदेशी मद्यसाठा हस्तगत करण्यात आला असून या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
गुन्हे शाखा कक्ष-2चे वपोनि गिरीधर गोरे यांना बातमीदाराकडूनकसळखंड या ठिकाणी एका व्यक्तीकडे बेकायदेशीररित्यादेशी विदेशी मद्यसाठा व गावठी हातभट्टीची तयार दारू विक्रीसाठी जवळ बाळगत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक भरत पाटील,गुन्हे शाखा कक्ष-2चे पो हवा सचिन पवार, सुनिल साळुंखे, कुदळे, पोना प्रफुल्ल मोरे आदींच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून देशी विदेशी मद्यसाठा,हातभट्टीची तयार दारू व इतर ऐवज असा मिळून 12, 360 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करून या प्रकरणी एकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर कलम 41 (1)(अ) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार सचिन पवार करीत आहेत.