तळोजा कारागृहामधील आरोपीचा कोरोनामुळे मृत्यु.

तळोजा कारागृहामधील आरोपीचा कोरोनामुळे मृत्यु..पनवेल दि.09 (वार्ताहर)- कोरोनाची लागण झालेला व तळोजा कारागृहात सजा भोगत असलेल्या आरोपीचा कोरोनामुळे मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.
          सदर घटनेतील मृत आरोपी हा 26 वर्षांचा असून तो भिवंडी येथे राहण्यास होता. अल्पवयिन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी भिवंडी शहर पोलिसांनी त्याला 2018 मध्ये अटक केली होती. तेव्हापासून तो तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. या आरोपीला अस्थमा आणि हायपर टेंशनचा त्रास असल्याने त्याच्यावर कारागृहातील रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्याला जास्त त्रास जाणवू लागल्यानंतर त्याची एन्टीजेन चाचणी करण्यात आली. ती निगेटीव्ह आल्यानंतर त्याला उपचारासाठी मुंबईतील जे.जे. रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे या आरोपीची आरटीपिसीआर चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल पॉझिटीव्ह झाल्यानंतर त्याला कोव्हिड वरील उपचारासाठी जे.जे. रूग्णालयातून सेंट जॉर्ज रूग्णालयात हलविण्यात आले होते. याठिकाणी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यु झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.