227 कुटूंबियांना अन्नदानाचे किट वाटप करून राबविण्यात आला आगळावेगळा उपक्रम..
227 कुटूंबियांना अन्नदानाचे किट वाटप करून राबविण्यात आला आगळावेगळा उपक्रम..पनवेल दि.09 (वार्ताहर)- रिक्षाचालक, भाजीविक्रेते, मच्छीविक्रेते, घरकाम करणाऱ्या महिला अशा हातावर पोट असणाऱ्या 227 कुटूंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करून आ. प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते देवचंद बहिरा, युवामोर्चाचे जिल्हा संघटक प्रतिक बहिरा आणि भाजपा तक्का विभागीय कमिटीच्या वतीने आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.
परिसरातील अशा प्रकारे227 कुटूंबियांनातांदूळ पीठ 4 kg, साखर 1kg, चहा पावडर 50 ग्राम, मुगडाळ अर्धा kg, चना अर्धा kg, चवळी अर्धा kg, साबण 2 रिन, साबण 2 लॅक्स, जिरा, राई, पोहे अर्धा kg, sunflower तेल1, लोणचं, हळद, मीठ आदी वस्तूंचे वाटप यावेळी भाजपा पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक अजय बहिरा, माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, संदिप बहिरा, प्रभाग 20चे अध्यक्ष रघुनाथ बिहिरा, युवानेते प्रतिक बहिरा, जितु खुटकर, अतुल बहिरा, संदिप पगडे, जयदास कावळे, स्वरूप मुंबईकर आदींनी सध्याच्या कोरोना वैश्विक महामारी, लॉकडाऊन काळात अशा प्रकारे माता भगिनींना आपला संसार चालविणे कठीण होेते. अशांसाठी त्यांना मदतीचा हात म्हणून जीवनावश्यक वस्तूंचे किटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. फोटोः अन्नदानाचे किट वाटप