रामेश्वर महाराज आदिवासी संस्थेतर्फे आदिवासी वाड्यांवर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पनवेल, दि.26 (वार्ताहर): गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने तळागाळातील लोकांसाठी कार्यरत असणारे रामेश्वर महाराज आदिवासी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वर महाराज नरे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पनवेल तालुक्यातील तसेच महाड तालुक्यातील अनेक आदिवासी वाड्यांवरील बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

रविवार दि. 26 एप्रिल रोजी पनवेल तालुक्यातील कसळखंड येथील दुर्गम अशा आदिवासी वाड्यांवरील बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी रामेश्वर महाराज आदिवासी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वर महाराज नरे यांच्यासह उद्योजक संजय काठावले, दिपक जुमारे, भगवान पाटील, संतोष भोईर, अनिल पाटील, बाळाराम पाटील आदींसह इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या आदिवासी बांधवांना शासनामार्फत रेशनिंगचे धान्य मिळून देण्यासाठी पनवेल तहसिल कार्यालयात पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी रामेश्वर महाराज आदिवासी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वर महाराज नरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.