ट्रक अपघातात एक ठारः
आज रोजी 04:15 वाजता.च्या सुमारास पुणे मुंबई लेन किलोमीटर 09.600 जवळ ट्रक नंबर KA 22 C 3253 यावरील ट्रक चालक सत्यम अशोक घोडके वय.22 रा.मु.पो. कुदावाडी ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यास पनवेल एक्झिट येथून बाहेर पडावे की, ती सरळ जावे या गोंधळामध्ये त्याचा त्याचे ट्रक वरील ताबा सुटून समोर जाणार्या अज्ञात वाहनास पाठीमागून जोरात ठोकर मारून अपघात झाला आहे .सदर अपघातामध्ये डावे बाजूला बसलेला क्लिनर नामे बंडू तुकाराम गुरुनाथ साळगे वय.32 रा.मु.पो. कुदावाडी, ता. तुळजापूर , जि. उस्मानाबाद यास गंभीर दुखापती होऊन तो जागीच मयत झालेला आहे. मयत इसम यास देवदूत टीमने कटरच्या साहाय्याने व आय आर बी हायड्रा च्या मदतीने ने ट्रक मधून बाहेर काढून पुढील कार्यवाहीसाठी उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे पाठवण्यात आले आहे.आय आर बी कंपनीचे स्टाफच्या मदतीने गाडी रस्त्याच्या बाजूला करून रस्ता साफ करण्यात आलेला असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. सदर वेळी घटनास्थळावर पनवेल तालुका पोलीस ठाणे सपोनि कुदळे मॅडम व स्टॉप आणि पनवेल महानगरपालिका अग्निशामक दल हजर होते.