केएन फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेकांना मदतीचा हात.

केएन फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेकांना मदतीचा हात..
पनवेल, दि.8 (संजय कदम) ः कोरोना च्या दुसर्‍या लाटेने संपूर्ण विश्‍वाला पुन्हा एकदा वेठीस आणले ,असून कोट्यावधी बाधित झालेल्या पैकी लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहे परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे ,अशात राज्य सरकारचे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन हा पर्याय निवडला आहे त्यामुळे काही गरीब आणि गरजू लोकांवर उपासमारीची वेळ पुन्हा एकदा आली आहे ह्या संकटकाळात केएन फाऊंडेशन आणि त्यांचे फाउंडर समाजसेविका कोमल सुरज खोचरे उर्फ तावरे यांनी अनेकांना मदत करण्याचा आणि न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत.
केएन फाऊंडेशन (एनजीओ) दिवस-रात्र गरजू आणि गरीब लोकांसाठी कार्य करता येईल यासाठी झटत असतात कोविड-19 गरजू लोकांना या पार्श्‍वभूमीवर शासनाचे पालन करून नर्गिस दत्त नगर झोपडपट्टी वसाहत येथे अन्नधान्य किट व जीवनावश्यक वस्तू याचे वाटप केले तसेच केएन फाऊंडेशन सगळ्यांना आव्हान करत होते घरी राहा सुरक्षित राहा कोरानावर मात करू एकजुटीने , केएन फाऊंडेशन (एनजीओ) यांची फाऊंडर कोमल तावरे   आणि त्यांची टीम आणि  त्यांना मोलाची साथ देणारे राजेंद्र तावरे संदीप वर्मा विनायक तावरे उजेफ शेख सचिन गोरे किरण तावरे ,नागेश पवार, उमेश पवार,पुष्पा काळे ,सोमनाथ तावरे,सतीश पवार ,अक्षता बेलनकर, यांची मोलाची  साथ लाभली केएन फाऊंडेशन  वेळोवेळी अशीच लोकांच्या सेवेत येईल आणि अशी चांगले उपक्रम राबवतील, असे आशिर्वाद अनेकांनी दिले आहेत.
फोटो ः केएन फाऊंडेशनच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *