कंटेनरमधून 17 प्रवाशांना बेकायदेशीररित्या वाहतूक केल्याप्रकरणी केली कारवाई.

कंटेनरमधून 17 प्रवाशांना बेकायदेशीररित्या वाहतूक केल्याप्रकरणी केली कारवाई
पनवेल, दि.6 (संजय कदम) ः बॉडी कंटेनरमधून 17 पुरुष इसमांना बेकायदेशीररित्या घेवून जात असताना तळोजा वाहतूक चौकी समोर मिळून आल्याने दोघा जणांविरुद्ध तळोजा पोलिसांनी कारवाई केली आहे.
चंदनकुमार रामदेव राय (26 रा.झारखंड) व मुकेशकुमार डागी (रा.झारखंड) या दोघांनी त्यांच्या ताब्यातील बॉडी कंटेनर क्र.एनएल-01-एबी-6278 यामध्ये 17 पुरुष इसमांना बेकायदेशीर घेवून जात असताना तळोजा वाहतूक चौकी समोर तळोजा औद्योगिक वसाहत परिसरात आढळून आल्याने त्यांनी शासनाचे निर्गमित केलेल्या आदेशाचा भंग केला. तसेच जिवीतास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरविण्याचा संभव असलेली हयगयीची व घातक कृती करून इतरांचे जिवीत किंवा व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात आणण्याची कृती केली. त्याचप्रमाणे सरकारी कर्तव्य बजावत असलेल्या कर्मचार्‍यांशी हुज्जत घातल्याने त्याच्याविरुद्ध भादवी कलम 188, 186, 269, 270, 336 मोटार वाहन कायदा कलम 66 (1/92) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *