भरधाव महिंद्रा पिकअपची मोटार सायकलला धडक ; 1 ठार..
भरधाव महिंद्रा पिकअपची मोटार सायकलला धडक ; 1 ठार
पनवेल, दि.4 (वार्ताहर) ः भरधाव महिंद्रा बोलेरो पिकअप जीपवरील चालकाने मोटार सायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटार सायकलस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील खारपाडा-चिरनेर रोडवर दिघाटी येथे घडली आहे.
यामहा कंपनीची एफझेड मोटार सायकल क्र.एमएच-46-एएम-1786 ही घेवून अविनाश कातकरी (19) हा त्याच्या ताब्यातील गाडी घेवून हॉटेल साई सागर समोरील खारपाडा-चिरनेर रोडवर दिघाटी या ठिकाणावरुन जात असताना महिंद्रा बोलेरोे पिकअप जीप क्र.एमएच-43-बीजी-4480 वरील चालक जयप्रकाश गुप्ता (43) याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे चालवून समोरुन येणार्या मोटार सायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात अविनाश कातकरी हा गंभीररित्या जखमी होवून त्याचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.