मोटार सायकल खरेदी करण्याच्या बहाण्याने केली लंपास

मोटार सायकल खरेदी करण्याच्या बहाण्याने केली लंपास
पनवेल, दि.3 (संजय कदम) ः मोटार सायकल खरेदी करण्याच्या बहाण्याने मोटार सायकल लंपास केल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे.
किरण गुरव (21) यांना ओएलएक्स या ऑनलाईन वाहन विक्री करणार्‍या अ‍ॅप वरुन ओळखीच्या वशिम शेख याने गुरव याला फोन करून मोटार सायकल खरेदी करायचे असल्याचे सांगून त्यानुसार त्यांची 70 हजार रुपये किंमतीची काळ्या रंगाची पल्सर एनएस 200 मोटार सायकल क्र.एमएच-46-बीटी-8162 ही घेवून गार्डन हॉटेल समोरील जुन्या मुंबई-पुणे हायवे येथे बोलावून सदर गाडीची ट्रायल घेवून किरण गुरव हा मित्रासोबत बोलत उभा असताना लबाडीने वशिम शेख याने सदर गाडी घेवून तो पसार झाला आहे. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *