मदत नव्हे तर कर्तव्य… राजकारण नव्हे तर समाजकारण…

दिवंगत कामगार नेते श्याम म्हात्रे यांच्या कन्या श्रुती म्हात्रे यांचे कळकळीचे आव्हान

मदत नव्हे तर कर्तव्य…
राजकारण नव्हे तर समाजकारण…

कोरोना महामारी हे देशावर आणि जगावर आलेलं महासंकट आहे. अशी आरोग्य संकटं शंभर वर्षातून एकदा येतात. रायगड जिल्ह्यातही कोरोनाने थैमान घातले आहे. लोक त्रस्त आहेत. जिवाच्या भयाने भयभीत झालेत. या संकटाला सामोरे जाण्यासाठी रायगड, पनवेलची रहिवासी म्हणून मी सर्व राजकीय सामजिक नेते पदाधिकारी कार्यकर्त्याना याना कळकळी ची विनंती करते आणि एकत्र येण्याचे आव्हान करते.
कोविड व आयसोलेशन सेंटर वाढवण्याकरिता सर्व पक्षिय लोकांनी एकत्र यायला काय हरकत आहे?
प्रशासनाला नुसत्या बोंबा मारण्यापेक्षा सामजिक बांधिलकी जपण्यासाठी प्रशासनासोबत काम करता आल पाहिजे.
धनिक लोकांची काय कमी आहे आहे पनवेल आणि उरणला… निवडणूका आल्यावर रुपये 2000 एका मताला वाटण्याची ताकद ठेवणारे सर्व च उमेदवार आज का नाही स्व:ता ची ताकद कोविड सेंटर उभारण्यासाठी करत… मी पनवेलकर आणि ह्या विभागातील प्रकल्पग्रस्त आगरी समाजाची एक मुलगी म्हणून सर्व पक्षिय लोकाना आव्हान करते की isolation center किंवा covid center हे तातडीने करण्याची गरज आहे. रायगड जिल्हाधिकारी मा.निधी चौधरी मॅडम या विषयाबाबत सकारात्मक आहेत.
बेड ,इंजेक्शने ,ऑकसीजन मिळवुन देताना राजकीय श्रेय घेण्याच्या चढा ओढी मध्ये ताकद विखरुरलेली आहे. हे संकट जर सर्वानी मिळून दुर करण्याचे ठरवले तर आपल्या पनवेल उरण रसायनी येथील सर्व च नागरिकांना खुप मोठा दिलासा मिळेल.
नवी मुंबईत सिडको,रायगड जिल्ह्यात आरसीएफ, जेएनपीटी, ओएनजीसी, रिलायन्स सारखे अनेक लहानमोठे उद्योग आज प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवर कार्यरत आहेत. त्यांची ही नैतिक जबाबदारी आहे तसेच ह्या मोठ्या कंपन्यांमुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीत्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव देखील वाढत आहे. त्यामुळे या सर्व प्रकल्प, कारखान्यांचा सीएसआर कोरोना व आरोग्याच्या इतर सुविधांसाठी वापरणे राज्य सरकारने बंधनकारक केले पाहिजे
प्रशासन आणि राजकीय ताकद एक झाली तर आपण आणखीन एक संकट येण्या आधी सज्ज राहू. रायगड जिल्हा व नवी मुंबईतील स्पोर्ट कॉम्प्लेक्स, मोकळी मैदान, शाळा, कॉलेज, लग्नाचे मोठे हॉल,लॉन, गावागावातील समाजमंदिर यांचा उपयोग कसा करता येईल या बाबत नियोजन करणे आहे कारण आज दुसऱ्या लाटेत संपूर्ण देश हतबल झाला आहे असं तज्ञांच म्हणणं आहे की तिसऱ्या लाटेची पण शक्यता आहेत् यामुळे जिल्ह्यात 100 % लसीकरण कस होईल याचे ही नियोजन करणे आहे.प्रकल्प ग्रस्तांची तसेच पनवेल उरण च्या समाज बांधवांनी या पूर्वी गौरवशाली शौरवशाली लढा आदरणीय दि बा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली दिल्याचा धगधगता सर्वपक्षीय इतिहासआहे,शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन असलेल्या ह्या मातीत लढण्याची बीजे ही रोवलेली असताना आता फक्त वेळ आहे तुम्ही आम्ही एकत्र येऊन या विषाणू ला रायगडा तुन हद्दपार करण्याची व जे आज निराधार,वंचीत व औषधा विना असणाऱ्या आजारी अबाल वृद्ध तरुण मुले या सर्वांना धीर देऊन यातून बाहेर काढण्याची मा.जिल्ह्याधिकारी मॅडम निधी चौधरी सकारात्मक आहे मदत करायला ही समाधानाची बाब आहे.मा. पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, सदस्य ,महापौर, नगरसेवक सर्व जन प्रतिनिधी सामाजिक संस्था सर्व पक्षीय अध्यक्ष आपण सगळे एकजूट होऊन ह्या महामारी विरुद्ध उभं राहून हे संकट दूर करण्यासाठी सोबत उभे राहुयात!
आपली

  • श्रुती शाम म्हात्रे (कामगार नेता)
    अध्यक्ष
    कोकण श्रमिक संघ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *