30 ते 35 वयोगटातील महिलेची हत्या..

महिलेची हत्या
पनवेल, दि.3 (वार्ताहर) ः एका 30 ते 35 वयोगटातील महिलेची हत्या करून तिचे पाय कपड्याच्या चिरोटीने बांधून त्यावर पूर्ण शरिरावर गोधडी गुंडाळून व पुन्हा कापडी चिरोटीने बांधून तिचा मृतदेह पनवेल जवळील पनवेल-उरण रेल्वे ट्रॅक शेजारील सपाटीकरण केलेल्या जागेच्या बाजूला असलेल्या झाडीमध्ये निर्जन ठिकाणी टाकल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील कुंडेवहाळ गावच्या हद्दीतील कान्होबा ढाब्याच्या समोरील बाजूस पनवेल-उरण पनवेल जवळील पनवेल-उरण रेल्वे ट्रॅक शेजारील सपाटीकरण केलेल्या जागेच्या बाजूला असलेल्या झाडीमध्ये निर्जन ठिकाणी एक मृतदेह पडला असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी पनवेल शहर पोलिसांना दिली. त्यानुसार वपोनि अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक घटनास्थळी रवाना होवून त्यांनी या संदर्भात पूर्ण माहिती घेवून सदर मृतदेह ताब्यात घेतला आहे. या महिलेला का? व कोणत्या कारणासाठी मारण्यात आले तसेच ती या भागात राहणारी आहे काय? याचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *