ट्रान्सफार्मरमधून ऑईलची चोरी..

ट्रान्सफार्मरमधून ऑईलची चोरी…
पनवेल, दि.1 (संजय कदम) ः तालुक्यातील देवीचापाडा येथील ट्रान्सफार्मरमधून अज्ञात चोरट्यांनी 200 लीटर ऑईलची चोरी केल्याची घटना घडली आहे.
देवीचापाडा येथील विष्टा कंपनीच्या समोर असलेल्या रोहित्र 10 के.व्ही.ए. च्या ट्रान्सफार्मरमधून अंदाजे 200 लीटर ऑईल ज्याची किंमत जवळपास 38 हजार रुपये इतकी आहे. सदर ऑईल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात सहाय्यक अभियंता गणेश जाधव यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *