१ लाख रुपयांचा धनादेश रायगडच्या पालकमंत्री कु. आदितीताई तटकरे यांच्याकडे मुख्यमंत्री निधीसाठी सुपूर्द ..

कोविड झाल्यावर जशी वास घेण्याची क्षमता जाते, जिभेची चव जाते, तसं काहीसं मनाचं झालं आहे. आजूबाजूचं मरणाचं पेटलेलं स्मशान पाहून कुठलाच आस्वाद घेण्याची, आनंद उपभोगायची ईच्छा राहिलेली नाही. आज माझा वाढदिवस. मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत साजरा करायचा नाही असं ठरवलं. कोविडशी कडवी झुंज देणाऱ्या महाराष्ट्र सरकारला आपला छोटासा हातभार लावावा म्हणून १ लाख रुपयांचा धनादेश रायगडच्या पालकमंत्री कु. आदितीताई तटकरे यांच्याकडे मुख्यमंत्री निधीसाठी सुपूर्द करून आलो. जे पैसे अन्यथा मौजमजेत खर्च झाले असते, त्यातून कुणालातरी जगण्यासाठी ऑक्सिजन मिळेल हेच एकमेव समाधान!

© अभिजित पां. पाटील
कार्याध्यक्ष, पनवेल तालुका काँग्रेस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *