खांदेश्‍वर पोलीस ठाण्याच्या वतीने तळागळातील लोकांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..

खांदेश्‍वर पोलीस ठाण्याच्या वतीने तळागळातील लोकांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..
पनवेल, दि.30 (वार्ताहर) ः सध्याची कोरोना विषाणुमुळे निर्माण झालेली परिस्थिती व त्यातुन बंद पडलेले व्यवसाय व नोकरी यामुळे सामान्य गरीब लोकांचे अत्यंत हालाकिची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणुन पोलीस आयुक्त, नवी मुंबई बिपीन कुमार सिंग यांच्या संकल्पनेतुन तसेच पोलीस सह आयुक्त, डॉ.जय जाधव , पोलीस उपआयुक्त, परिमंडळ 2 पनवेल, शिवराज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली , वरिष्ठ पोलीस निरीक्षक खांदेश्‍वर पोलीस ठाणे, देवीदास सोनवणे यांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी परिसरातील अनेक संस्था व लोकांना तसेच आश्रम यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
त्यामध्ये प्रामुख्याने बालग्राम आश्रम से .12 खांदाकॉलनी या अनाथ लहान मुलांचे आश्रमात,  मंगलाश्रय सामाजिक संस्था से.7 खांदा कॉलनी, या अनाथ मुलींचे आश्रमाला तसेच से .5 नवीन पनवेल येथील गुरूद्वरा येथे, सहा.पोलीस आयुक्त, पनवेल विभाग नितीन भोसले पाटील यांचे हस्ते एकुण 1200 किलो तांदुळ, 600 किलो गहु, 600 किलो दाळ, 45 किलो तेल, 10 किलो पीठ व इतर जीवनावश्यक व शाळेच्या वस्तु मदत स्वरूपात देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *