कोरोना पॉझिटिव्ह आरोपीचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न…! पनवेल इंडियाबुल्स येथील घटना… बायको ची हत्या केली प्रकरणी केली होती अटक..

कोरोना पॉझिटिव्ह आरोपीचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न…!
पनवेल इंडियाबुल्स येथील घटना… बायको ची हत्या केली प्रकरणी केली होती अटक..

पनवेल वार्ताहर :-  कौंटुंबिक वादातून शनिवारी 24 एप्रिल रोजी सकाळी पतीने पत्नीच्या डोक्यात, मासे कापण्याचा कोयता घालून
पत्नीची हत्या केल्याचा प्रकार घडला होता. ही घटना
पनवेल जवळील करंजाडे वसाहतीमध्ये घडली होती. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी हत्या करणाऱ्या पती संतोष पाटील याला अटक केली होती, मात्र अटक करते वेळी  तो कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याने त्याला उपचारार्थ तात्काळ पनवेल येथील, इंडिया बुल्स या कोव्हिड सेंटरमध्ये दाखल कऱण्यात आले होते . या कोव्हिडं सेंटर मध्ये आरोपीवर उपचारा सुरू होते,  मात्र बुधवारी सकाळी उपचारा दरम्यान आरोपीने  इमारतीच्या 15 व्या मजल्यावर जाऊन, आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आत्महत्या करते वेळी घटना स्थळी पोचलेल्या पोलिसांनी त्याची समजूत काढण्यात यश मीळवले असून त्याला गोड बोलून खाली बोलवत त्याला ताब्यात घेतले आहे.
     हा सर्व प्रकार बुधवारी सकाळी सुरू झाला होता. आरोपी हा कोव्हिडं सेंटरच्या दुसऱ्या मजल्यावर उपचारा घेत असल्याचे सांगितले जात आहे. या दरम्यान आरोपीने रूम मधून बाहेर पडून, इमारतीच्या डक मधून चढत जाऊन 15 व मजला गाठला आणि मी आत्महत्या करणार असे ओरडू लागल्या नंतर, या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकांना ही माहिती मिळताच या

या घटनेची माहिती  पनवेल शहर पोलिसाना दिली पोलिसांनी घटनास्थळी पोचून घटनेची माहिती घेऊन आणि अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केले. आणि त्या नंतर आरोपीला समजवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आरोपीची समजुत काढल्या नंतर, आरोपीला खाली बोलवूंन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

काय आहे प्रकार
   करंजाडे वसाहतीमध्ये सेक्टर ४, प्लॉट नं २०, साई सत्यम सोसायटीमधील तिसर्‍या मजल्यावर बी-305 येथे राहणारे आरोपी संतोष पाटील (वय ४0) व त्यांची पत्नी संध्या पाटील (वय ३5) राहतात, हे कुटूंब गेल्या काही दिवसा पासून कोरोनाने प्रभावीत झाले होते. आरोपी हा आजारी असताना औषधोपचार करण्यासाठी बायकोने डॉक्टरांकडे घेऊन न जाता त्याला गॅलेरीत 4-5 दिवस विलगीकरण करून ठेवले या गोष्टीचा राग संतोष यांनी मनात धरून संध्याशी त्यांनी वाद घालून मासे कापण्यासाठी लागणारा कोयता आपल्या पत्नीच्या डोक्यात घालून तीची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अजयकुमार लांडगे व ठसे तज्ञ इतर पथक घटना स्थळी पोहचले. अधिक चौकशी प्रकरणी पोलिसांनी पती संतोष पाटील याला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पाटील कुटूंबियांना १ मुलगा असल्याचे समजतेय. याप्रकरणी पोलिसांनी संतोषला ताब्यात घेऊन त्याची रवानगी कोव्हिड सेंटरमध्ये केली होती . 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *