चिंचपाडा येथील गतिरोधकचा चेंडू विमानतळ कार्यालयात ; सिडको अधिकार्‍यांनी पत्र पाठवले विमानतळ विभागात…

चिंचपाडा येथील गतिरोधकचा चेंडू विमानतळ कार्यालयात ; सिडको अधिकार्‍यांनी पत्र पाठवले विमानतळ विभागात…
पनवेल, दि.28 (वार्ताहर) ः चिंचपाडा येथील उड्डाण पुलाखाली मुख्य चार रस्त्यावर पनवेल बाजूकडून उरणच्या दिशेने जाणार्‍या, कळंबोली-पनवेल, करंजाडे-पनवेल च्या दिशेने जाणार्‍या रस्त्यावर  गतिरोधक नसल्यामुळे अपघात घडत आहेत. मात्र गतिरोधक उभारण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र गायकवाड यांनी पनवेल शहर वाहतूक पोलीस, सिडको अधिकार्‍यांना पत्रव्यवहार केला आहे. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी पाठवलेले पत्र नवीन पनवेल सिडको अधिकार्‍यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 1 कार्यालयात पत्र फॉरवर्ड केले आहे. मात्र गतिरोधकचा चेंडू आता विमानतळ कार्यालयात गेला आहे.
सिडकोद्वारे नव्याने विकसित होणार्‍या करंजाडे वसाहतीच्या बाजूलाच चिंचपाडा येथे उड्डाणपुलाच्या बाजूला चार रस्ते आहेत. करंजाडे ते कळंबोली – पनवेल, कळंबोली ते उरण- पनवेल, पनवेल-उरण असा चार रस्ता आहे. मात्र या रस्त्यावर चारही बाजूने वाहने हे भरधाव वेगाने येत असतात. यामुळे येथे अपघात होऊन दुखापत होण्याची शक्यता आहेतच. नुकताच दुचाकीस्वार उरणच्या दिशेने जात होता. त्यावेळी पनवेल बाजूकडून उरणच्या दिशेने जात असताना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे व हयगयीने अतिवेगाने वाहन चालविल्याने त्याला स्कॉर्पिओवरील ताबा सुटल्याने मोठा अपघात घडला होता. तसेच अनेक अपघात या रस्त्यावर घडले आहेत. तसेच किरकोळ अपघात घडत आहेत. करंजाडे ते कळंबोली-पनवेल, कळंबोली ते उरण- पनवेल, पनवेल-उरण असा चार रस्ता आहे. मात्र या रस्त्यावर चारही बाजूने वाहने हे भरधाव वेगाने येत असतात. त्यामुळे या रस्त्यावर गतिरोधक उभारण्यासाठी रवींद्र गायकवाड यांनी पनवेल शहर वाहतूक शाखा तसेच सिडकोला पत्रव्यवहार केला आहे. त्यानुसार पनवेल शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित मोहिते यांनी अपघाताच्या ठिकाणाची पाहणी करून या मुख्य चार रस्त्यावर गतिरोधक उभारण्यासाठी सिडकोला पत्रव्यवहार केला आहे. आता नवीन पनवेल सिडको कार्यालयातील अधिकार्‍यांनी हा रस्ता विमानतळ कार्यालयाच्या अखत्यारीत येत असल्याने गतिरोधक उभारण्याबाबतचा पत्र सीबीडी बेलापूर येथील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 1 या विभागात पत्र पाठविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *