लाइफ लाइन हॅास्पिटल, रूग्ण व त्यांचे नातेवाईकांनी मानले नवी मुंबई पोलीसांचे मनापासून आभार..

लाइफ लाइन हॅास्पिटल पनवेल येथे कोविड रूग्णांसाठी ८० बेडची सुविधा असुन बरेच रूग्णांना ॲाक्सीजन चालु आहे, त्यामध्ये इतर रूणानांबरोबर नवीमुंबई , रायगड , महामार्ग येथील १५ पोलीस व त्यांचे कुटुंबिय उपचार घेत आहेत.
आज रोजी रूग्णालयतील उपचार घेत असलेल्या रूग्णांना केवळ ४/५ तास पुरेल एवढा ॲाक्सीजन साठा उपलब्ध होता, ॲाक्सीजन साठी हॅास्पिटलचे अधिकारी यांची धावपळ सुरू होती वेळेवर ॲाक्सीजन उपलब्ध झाला नाही तर रूग्णांना इतर
हॅास्पिटलमध्ये हलवावे लागण्याची भयंकर परस्थिती निर्माण झाली होती
अशा वेळी हॅास्पिटलचे डायरेक्ट श्री पराग बेडसे यांनी नवी मुंबई पोलीसांकडे ॲाक्सीजन पुरवठ्यासाठी विनंती केली ,
डॅा.बी.जी .शेखर पाटील यांना याबाबत माहीती मिळताच त्यांनी गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस आयुक्त श्री . विनोद चव्हाण व वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोल्हटकर यांचेवर तात्काळ ॲाक्सीजन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सोपविली .
वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोल्हटकर व त्यांचे अधिनस्त अंमलदार सतिष सरफरे व अतिष कदम यांचे सहकार्याने महापे येथे ॲाक्सीजन पुरवठा करणारे कंपनीमध्ये समक्ष जाऊन चर्चा करून २५ ॲाक्सिजनचे कमर्सियल गॅस सिलेंडर ( ४० रूणांना दोन ते तिन दिवस पुरतील ) एवढे उपलब्ध करून लाइफ लाइन हॅास्पिटल पनवेल येथे विनामुल्य पाठवुन वेळेवर मदत केल्याने रूग्णांना ॲाक्सीजन पुरवठ्याचे संकट दुर करून एक सामाजिक बांधिलकी जपली. तसेच तेथे नियमित ॲाक्सीजन पुरवठा करणेस कंपनीस सांगितले आहे.
याबद्दल लाइफ लाइन हॅास्पिटल, रूग्ण व त्यांचे नातेवाईकांनी नवी मुंबई पोलीसांचे मनापासून आभार मानुन अतिशय महत्वाचे वेळी विनामुल्य ॲाक्सीजन पुरविले बद्दल आभार मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *