रिक्षा चालकांना शासनाने जाहीर केलेली मद्दत कशी मिळणार रिक्षा चालक संभ्रमात…

रिक्षा चालकांना शासनाने जाहीर केलेली मद्दत कशी मिळणार रिक्षा चालक संभ्रमात
पनवेल/प्रतिनिधी:- लॉकडाऊन मुळे रिक्षा चालकावर उपास मारीची वेळ आली आहे व्यवसाय बंद झाले आहे, घर कसे चालवायचे या चिंतेत महाराष्ट्रातला रिक्षा चालक पडला आहे.यात सरकारने तोकडी मद्दत परवाना धारकांला 1500 रुपयांची मद्दत जाहीर करून थोडा दिलासा दिला परंतु 1500 रुपयांची मद्दत कशी मिळणार याची माहिती सरकारने जाहीर न केल्या मुळे रिक्षा चालक संभ्रमात पडला आहे शोशल मीडिया मध्ये त्या बद्दल चुकीची माहिती पसरवली जात आहे व्हाट्स अँप वर कागद पत्र जमा करा लिंक वर माहिती भरा असे sms सध्या सर्वत्र पसरले आहे. तरी आपली वयक्तिक माहिती कुठे ही भरू नये आपल्या वयक्तिक माहितीचा दुरुपयोग केला जाऊ शकतो.माहिती भरण्यासाठी अजून सरकार कडून कुठली अधिकृत साईट किंवा माहितीu पत्रक जारी केले नाही तरी रिक्षा चालकाने अफवावर विश्वास ठेऊ नये असे अधिकृत माहिती आल्यास सर्व रिक्षा चालकांना दिली जाईल असे आव्हान श्री. संतोष शिवदास आमले यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *