माझ्या दुष्काळी माण मधील वृक्षप्रेमी लेकरांनी माळराणाचे रूपांतर केले हिरवाईमध्ये..

माझ्या दुष्काळी माण मधील वृक्षप्रेमी लेकरांनी माळराणाचे रूपांतर केले हिरवाईमध्ये।

१.रोहित शंकर बनसोडे एफ.वाय.बी.ए.
२.रक्षीता शंकर बनसोडे ,११वी.सायन्स
दहिवडी काॅलेज दहिवडी.
या बहीण भावंडांनी आज महाराष्ट्राला एक हिरवाईचा आदर्श वस्तुपाठच घालून दिला।
रोहित व्यायामासाठी एका माळरानावर जात असे। त्या माळरानाला जाताना रोज त्याच्या मनात एक कल्पना येत असे की हे माळरान एक दिवस आपण हिरवाईत बदलले असेल।
त्याने काम सुरू केले रोज बॅग मध्ये पाण्याच्या बाटल्या, खोरे, कुदळ घेऊन जाऊ लागला। भले मोठे माळरान……हाताला फोड येऊ लागले, त्या हातातून रक्त येताना पाहिले ते बहीण रक्षिताने। मग दोघे मिळून रोज श्रमदान करू लागले मातीची सेवा करीत राहिले आणि 2 वर्षात हे माळरान हिरवे गार करून टाकले। आता तिथे झाडे डौलाने वाढतात। 5000 झाडे लावून या बहीण भावांनी मातीचे कर्ज फेडले असे म्हणायला हरकत नाही।
ज्या लेकरांनि मातीला माळरानावर पाणी आणि खत घालून संवर्धन केले ,झाडे लावली जोपासली त्या लेकरांना भूमातेची अखंड सेवा करणाऱ्या कुटुंबास मधुरा फाऊंडेशनकडून सलाम।

त्या कुटुंबाचा सुद्धा नंबर आम्ही देत आहोत सोबत त्यांच्या महान कार्याचे फोटो पाठवीत आहोत। जमलेस त्यांना अभिनंदनाचा फोन नक्की जाऊद्या
पत्ता सुद्धा देत आहोत।
संपर्क करा
मु.पो.दहिवडी.ता.माण.जि.सातारा.
राहण्याचा पत्ता– मु ,पो , गोंदवले खुर्द
ता ,माण
जि , सातारा.
9503070900
7620042739

आखंडीत श्रमदान पर्यावरण संरक्षण व दुष्काळ मुक्ती साठी आखंडीत लढाई,,,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *