अल्पवयीन मुलीला गरोदर करून त्यानंतर नवजात बाळाची वाढ होवू न देता त्याच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल..

अल्पवयीन मुलीला गरोदर करून त्यानंतर नवजात बाळाची वाढ होवू न देता त्याच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल..
पनवेल, दि.19 (वार्ताहर) ः एका अल्पवयीन मुलीवर वारंवार जबरीने संभोग करून नंतर तिला मारहाण करून सदर मुलीला दिवस गेलेले असतानाही मेडीकलमधून गोळ्या आणून सदर मुलीला जबरदस्तीने खाण्यास भाग पाडून त्या नवजात बालकाची वाढ होवू न देता त्याच्या मृत्यूप्रकरणी सदर इसमाविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर अल्पवयीन 15 वर्षीय मुलीला आरोपीने हाताचापटीने मारहाण करून त्याच्या राहत्या घरामध्ये पिडीत मुलीवर वारंवार जबरीने संभोग करून सदर पिडीत मुलीस दिवस गेलेले आहेत हे माहित असताना सुद्धा त्यांनी बाळ खाली करण्यासाठी मेडीकलमधून गोळ्या आणून पिडीत मुलीस मारहाण करून तीला जबरदस्तीने खाण्यास भाग पाडून नवजात बालकाची वाढ होवू न देता त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सदर इसमाविरोधात भादवी कलम 376 (फ), 376 (एन), 315, 323, बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमन 2012 चे कलम 4,6,8,10 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *