रायगड जिल्हा खासगी प्राथमिक शाळा कर्मचारी संघटनेच्या जिल्हा कार्यकारणी अध्यक्षपदी देविदास गायकवाड….

पनवेल , ता १७ रायगड जिल्हा खासगी प्राथमिक शाळा कर्मचारी संघटनेच्या जिल्हा कार्यकारणीची सभा शनिवार ता .१७ रोजी झूम यंत्रणेद्वारे पार पडली . या कार्यकारणीच्या अंतर्गत येणाऱ्या पनवेल , उरण तालुका कार्यकारणीच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड यांची एकमताने निवड करण्यात आली .

त्याच प्रमाणे कार्याध्यक्ष सुभाष मानकर , उपाध्यक्ष निशा देवरे, तर सचिवपदी अनंत ठाकूर यांची निवड करण्यात आली . तसेच सहसचिव कमोरुद्दीन मन्सुरी , कोषाध्यक्ष नारायण सावंत तर सदस्य म्हणून अख्तरी दळवी , सुजाता भोसले , सोनल पिसाळ , प्रदीप पाटील , प्रभाकर गावंड यांची निवड करण्यात आली .

रायगड जिल्हा खासगी प्राथमिक शाळा कर्मचारी संघटना ही शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी संघटना म्हणून काम करीत आहे. परंतु या सोबतच आपली सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक हिताचे उपक्रम देखील राबवित आहे.

या सभेत रायगड जिल्हा खासगी प्राथमिक शाळा कर्मचारी संघटना अंतर्गत येणाऱ्या पनवेल , उरण कार्यकारीणीची निवड करण्यात आली तसेच अनेक सामाजिक हिताचे ठराव संमत केले. याबरोबरच संघटनेच्या मूळ हेतूला बांधील राहून शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येकाने तत्पर राहण्याचे सभेमध्ये ठरविण्यात आले आणि त्यासाठी सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांनी सजग राहून आपापल्या स्थरावर तसेच संघटनेच्या माध्यमातून एकजुटीने काम करण्याची ग्वाही सभेमध्ये सभासदांनी दिली.
या निवडी बद्दल जिल्हा संघटनेचे अध्यक्ष संदीप कदम , उपाध्यक्ष सुधाकर जैवळ , कार्याध्यक्ष साईनाथ गावंड , जिल्हा संघटक ज्ञानेश्वर ठाकूर , सचिव यशवंत मोकल तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

शिक्षकांना अनेक समस्या भेडसावत आहेत त्या सोडविण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन त्यावर काम करणार आहोत. समस्येच्या मुळाशी जाऊन शिक्षकाला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचा विश्वास देविदास गायकवाड यांनी बोलताना व्यक्त केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *