कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शिवा संघटनेच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती पंधरवाडा रद्द केल्याची घोषणा

शिवा संघटनेच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे 40 बैठका संपन्न.

शिवा संघटनेच्या वतीने 26 एप्रिलला सकाळी 10 वाजता आप-आपल्या घरी एकाच वेळी कुटुंबाकडून महात्मा बसवेश्वरांना जयंती निमित्त अभिवादन करण्याचा निर्णय.

उरण दि 24(विठ्ठल ममताबादे) कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी 24 मार्च 2020 ते 14 एप्रिल 2020 पर्यंत देशभर “लाॅकडाऊन” घोषीत करून पुन्हा त्यात 3 मे पर्यंत वाढ केली आहे.

शिवा संघटना मागील 20 वर्षांपासून प्रतिवर्षी महात्मा बसवेश्वर जयंती द्विपंधरवाडा मोठ्या उत्साहात साजरा करते, परंतु यावर्षी कोरोनामुळे देशात लाॅकडाऊन चालु आहे.त्यामुळे दिनांक 26 एप्रिल 2020 रोजी “जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर यांची 889 वी जयंती” असल्यामुळे या वर्षीचा शिवा संघटनेचा महात्मा बसवेश्वर जयंती पंधरवाडा रद्द करण्याचा निर्णय व्हीडियो कॉन्फरेन्स
द्वारे झालेल्या राज्य पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जाहिर केला आहे. परंतु तरीही जयंतीच्या दिवशी सकाळी ठिक “दहा वाजता” आप-आपल्या घरी हजारो कुटुंबाकडुन जयंती साजरी करणार असल्याची घोषणा शिवा संघटनेकडून करण्यात आल्याची माहिती शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी व्हिडियो कॉन्फरेन्सद्वारे दिली आहे.दरम्यान राज्याचे मा.मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री,नगरविकास मंत्री आदि शासनाच्या महत्वाच्या मंत्री,प्रशासनास पत्रव्यवहार करून शासनाच्या विविध कार्यालयात सोशल डीस्टनिंगचे नियम पाळून महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात यावी तसे संबंधितांना आदेश द्यावेत याबाबत लेखी स्मरण पत्र शिवा संघटनेच्या वतीने देण्यात आल्याचेही माहिती यावेळी प्रा. मनोहर धोंडे यांनी दिली आहे.

महात्मा बसवेश्वर जयंती आप-आपल्या घरीच साजरी करण्याचे शिवा संघटने तर्फे आवाहन.

शिवा संघटनेच्या वतीने शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहरजी धोंडे सर यांनी आवाहन केले आहे की, “अक्षय तृतीया” रविवार दि.26 एप्रिल 2020 रोजी सकाळी ठिक 10 वाजता, वीरशैव-लिंगायत धर्माचे प्रचारक व प्रसारक क्रांतीसुर्य, जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर यांची 889 वी जयंती हजारो कुटुंबांकडुन एकाच वेळी आप-आपल्या घरीच कुटुबांसह साजरी करा. त्यासाठी सर्वांनी जयंतीच्या दिवशी सकाळी स्नानपुजा करून घरासमोर रांगोळी काढाव्यात आणि आप-आपल्या घरावर शिवा संघटनेचा झेंडा/ध्वज लावावा आणि घरातच महात्मा बसवेश्वराचा फोटो/प्रतिमा/पुतळा मांडणी करून कुटुंबातील सर्व सदस्यांनी विभुती,भस्म लावुन, आपल्या गळ्यात शिवा संघटनेचा रूमाल घालावा आणि सकाळी बरोबर 10 वाजता घरातच महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे विभुती,भस्म हळदी-कुंकु लावुन, बेल-फुल वाहुन पुजन करावे आणि घरच्या फुलांनी बनवलेला हार उपलब्ध असेल तर (कृपया बाहेरील फुलांचा हार विकत आणु नये) तो पुष्पहार व शिवा संघटनेचा रूमाल महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेला घालावा आणि सर्व कुटुंबीयांनी प्रतिमेसमोर हात जोडून उभे राहुन अभिवादन करावे. अभिवादन करतांनाचा फोटो तसेच रांगोळीचा व घरावर शिवा संघटनेचा झेंडा लावलेला फोटो काढून आपले नाव, पद, पत्ता टाकुन सोशल मिडियावर सकाळी ठिक 11 वाजेच्या अगोदर टाकावा.याच पद्धतीने महाराष्ट्रासह देशभरातील लाखो कुटुंबाकडून सकाळी ठिक 10 वाजता जयंती निमित्त एकत्रित अभिवादन केल्याचे फोटो सोशल मिडियावर टाकण्यात यावे असे आवाहन शिवा संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

शिवा संघटनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस रूपेश होनराव,प्रदेशाध्यक्ष सोशल मीडिया महाराष्ट्र राज्य-मनीष पंधाडे,राज्य संघटक-नारायण कंकणवाडी यांच्यासह राज्यातील विविध विभागातील जिल्हयाचे सर्व जिल्हाध्यक्ष,पदाधिकारी-कार्यकर्ते सोशल मीडियाद्वारे तळागाळात संपर्क साधुन लॉक डाऊन व संचार बंदीचे नियम पाळून पोलिस प्रशासनाला सहकार्य करत बसवेश्वर जयंती घरीच साजरा करण्याविषयी जनजागृती करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *