सातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी..

सातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी..

सातारा : दरवर्षी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महिलांना त्यांच्या अधिकारांविषयी जागरुक करणे हा या दिवसाचा मुख्य हेतू आहे. आपल्या घरापासून ते देशाच्या विकासामध्येही महिलांचे मोठे योगदान आहे. या दिवशी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने महिलांप्रति आदर व्यक्त करतात. यानिमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचंही आयोजन केले जाते. प्रत्येक ‘ती’चं आपल्या आयुष्यातील स्थान अतिशय महत्त्वाचे-खास आहे, ‘ती’नं केलेल्या प्रत्येक कार्याचा आम्हाला आदर आहे; अशा बऱ्याच गोष्टींची जाणीव ‘ती’चा सन्मान करून दिली जाते. अश्याच एका सातारा येथे उल्लेखनीय कार्यक्रमात जागतिक महिला दिनानिमित्त समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महिलांचा जिजाऊ विशेष गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यात पनवेल मधील कर्तबगार स्त्री, सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या पत्रकार तथा क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशन च्या अध्यक्षा सौ. रुपालीताई शिंदे यांचा जिजाऊ विशेष गौरव पुरस्कार देऊन यथोचित असा सन्मान करण्यात आला आहे. यावेळी उपस्थित सर्व अतिथी व विशेष मान्यवरांचे त्यांनी आभार व धन्यवाद व्यक्त केले, अधिक जोमाने समाजकार्य करेन, असे मत व्यक्त केले.

स्त्रीमध्ये असते शक्ती अपार,
स्त्री आहे या सृष्टीचा आधार,

करा स्त्रीचा नेहमीच सन्मान,
कारण तिच प्रत्येकाच्या जीवनाचे सार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *