लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष विरेंद्र म्हात्रे यांनी घेतली कोरोनाची दुसरी लस..

लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष विरेंद्र म्हात्रे यांनी घेतली कोरोनाची दुसरी लस..

नवी मुंबई: पत्रकार आणि नवी लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष विरेंद्र म्हात्रे यांनी सोमवारी (दि. २३ मार्च) सकाळी कोरोनाची लस घेत  नवी मुंबईतील नागरिकांनाही कोरोनाच्या विळख्यातून शहराला  वाचविण्यासाठी कोरोनाची लस  लवकरात लवकर घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
पूर्वी अन्न, वस्त्र, निवारा जीवनावश्यक गरजा मानल्या जात होत्या. आता गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीच्या विळख्यात आपला देश अडकला आहे. या विळख्यातून सुटका झाली तरच अनेक समस्यांचे आपोआपच निवारण होवून देशाला प्रगतीपथावर घेवून जाणे शक्य आहे. वर्षभरात उद्योगधंदे ठप्प आहे, बेरोजगारी वाढली आहे, बालक-पालक घरातच आहे. हे चित्र बदलण्यासाठी आता सर्वाचाच पुढाकार हवा. सर्वाचेच योगदान हवे. बोलण्यातून नव्हे तर कृतीतून योगदान द्या. लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष विरेंद्र म्हात्रे नवी मुंबईत सतत नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नागरिकांच्या गराड्यात असतात. नागरिकांच्या समस्या निवारणासाठी महापालिका मुख्यालय ते पोलीस आयुक्तलयात तसेच मंत्रालयात दरररोजच चपला झिजवित असतात. नेरूळ येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयातही सतत नागरिकांचा राबता पहावयास मिळतो. सोमवारी सकाळी लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष विरेंद्र म्हात्रे यांनी कोरोना महामारीवरील लस घेत आपली सामाजिक बांधिलकी जोपासली. कोरोना नियत्रंणासाठी लसीकरण आवश्यक आहे, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. चला तर मग, वेळ का दवडता, मुहूर्ताची वाट पाहत आहात का? नाही ना, मग आजच तुम्हीही स्वत: लसीकरण करून समाजापुढे कोरोनामुक्तीचा आदर्श ठेवा, असे आवाहन विरेंद्र म्हात्रे यांनी नवी मुंबईकरांना  यावेळी केले  आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *