राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र-2, पनवेलने केेली गावठी हातभट्टीसह इतर साहित्य व एक इको कार जप्त

पनवेल दि. 23 (वार्ताहर)- राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र-2, पनवेल यांनी आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून गावठी हातभट्टीसह इतर साहित्य व एक इको कार जप्त केली आहे. यामुळे अशा प्रकारे बेकायदेशीररित्या अवैध धंदे करणाऱ्यांचे कंबरडे मोडले असून जवळपास 5, 48, 290/- रू. किंमतींचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शहरातील संत जगनाडे चौक पनवेल तसेच वेश्वी गावच्या जंगल भागात घर नं.-501च्या मागील बाजूस तालुका उरण येथे अवैध गावठी हातभट्टीसाठी लागणारा गूळ वाहतूकीवर पाळत ठेवून छापा घालत असताना एक इको गाडी क्र- एमएच 46 बीएन 2553 नंबरमधून गावठी हातभट्टीसाठी लागणारे साहित्य गूळ, साखर, बीबवे, नवसागर, अवैधरित्या वाहतूक करीत असताना आरोपी नावे जयवंत कडू (वय-59), रोशन कडू (वय-22) यांच्या सह इको गाडी व गूळ 198 किलो, 50 किलो साखर, दोन किलो बीबवे, 2 किलो तुरटी, 2 किलो नवसागर, 700 लि. रसायन व 108 लि. गावठी दारू असा एकूण जवळपास 5, 48, 290/- रू. किंमतींचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच या गुन्ह्यात अशोक ठक्कर हा गूळ पुरवठा करणारा संशयित इसम असून त्याचा शोध भरारी पथक करीत आहे.

सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र, मुंबईचे आयुक्त कांतिलाल उमाप, अमल बजावणी व दक्षता संचालक श्रीमती उमा वर्मा, राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य, मुंबई विभागीय उपायुक्त सुनिल चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क रायगड अधिक्षक सीमा झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस.एस. गोगावले, निरीक्षक अविनाश रणपिसे, दुय्यम निरीक्षक शिवाजी गायकवाड, जवान पालवे, मोरे, पोकळे, कदम यांनी या कामगिरीत सहभाग घेतला होता. तसेच सोबत मनोज भोईर व अनंत जगदाडे यांनी मदत केली. सदर गुन्ह्याचा तपास राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक सीमा झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक शिवाजी गायकवाड करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *