जागतिक महिला दिनानिमित्ताने कर्तृत्ववान महिलांचा “जिजाऊ गौरव पुरस्कार” देऊन सन्मान..

जागतिक महिला दिनानिमित्ताने कर्तृत्ववान महिलांचा “जिजाऊ गौरव पुरस्कार” देऊन सन्मान..

सातारा : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दि. २०/०३/२०२१ रोजी मा.सौ.सविताताई शिंदे यांनी सामाजिक राजकीय शैक्षणिक वैद्यकीय ज्यांना एकच कन्या आहे ज्यांचे पती किंवा मुलगा आर्मी मध्ये आहेत, ज्या महिला काबाड करून कष्ट घर चालवतात, ज्यांनी कोरोना महामारीत मदत केली. बचत गट हया माध्यमातुन लघु उद्योग करतात,कला क्षेत्र, क्रीडा क्षेत्र आशा वेगवेगळ्या क्षेत्रातील माता भगिनीं यांना २०/०३/२०२१ रोजी दु २ ते ४ दैवज्ञ हॉल सातारा या ठिकाणी जिजाऊ गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले.
सर्वश्रुत असलेल्या ज्येष्ठ समाजसेविका जयश्री माई सावर्डेकर यांचा सर्वत्र नावलौकिक आहे. स्वतःला समाजासाठी कसे झोकून द्यावे हे माईन कडून शिकावे. ज्याने हाक दिली त्याच्या हाकेला प्रतिसाद दिलाच असा त्यांचा स्वभाव. मनमिळाऊ, कर्तृत्ववान, मेहनती असे व्यक्तिमत्व शोधून ही सापडणार अश्या जयश्री माई सावर्डेकर..त्यांच्या च कार्याची दखल घेऊन त्यांच्या सह अनेक प्रतिभाशाली महिलांचा कोरोनाच्या नियमांचे पालन करून सातारा येथे जिजाऊ गौरव पुरस्कार सोहळा हा छोटेखानी कार्यक्रम मा.सौ.सविताताई शिंदे जिल्हाध्यक्षा पोलीस युवा मित्र
प्रदेशध्यक्ष शिवबा संघटना महाराष्ट्र राज्य मा.सौ.शारदा भस्मे सातारा जिल्हा महिला अध्यक्षा शिवबा संघटना ,खटाव तालुका राष्ट्रवादी तालुका अध्यक्षा, यांच्या संयुक्त विधमानाने आयोजित करण्यात आला होता. यावेळी जयश्री माई सावर्डेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला. उपस्थित सर्व कर्तबगार महिलांच्या कार्याचा गौरव करून त्यांना जिजाऊ पुरस्कार देऊन नावाजण्यात आले.
या सोहळ्यास प्रमुख पाहुणे सौ.सविताताई शिंदे जिल्हाध्यक्ष पोलीस युवा मित्र प्रदेशध्यक्ष शिवबा संघटना महाराष्ट्र राज्य व मा.श्री.राजेद्रं यादव पोलीस उपनिरीक्षक, महाक्रांती राष्ट्रीय अध्यक्षा- मा .सौ. जयश्री माई सावर्डेकर , भारतीय महा क्रांती जिल्हा सातारा महिला अध्यक्षा- मा.सौ.शारदा भस्मे ,क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशन महिला अध्यक्षा- मा. सौ .रूपालिताई शिंदे , मानवधिकार रायगड जिल्हा जण संपर्क अधिकारी- मा.सौ .वंदना बामणे , क्रांतीज्योत महिला फाउंडेशन च्या कळंबोली महिला विभागीय अध्यक्षा- -मा.सौ.सायली उलवेकर, संदिप शिंदे जिल्हाध्यक्ष शिवबा संघटना, नेहा लोहार पोलीस युवा मित्र शहर अध्यक्ष, मंगल शिंदे पुणे जिल्हाध्यक्ष शिवबा संघटना, अर्चना शेतोळे, मिना गजवडे,शहर अध्यक्ष शिवबा संघटना कोमल राजु जाभंळे शहर उपअध्यक्ष शिवबा संघटना, शिवबा संघटना तालुका अध्यक्षा (वडूज) मा. सौ .सलमा डांगे , शिवबा संघटना तालुका कार्याध्यक्ष (वडूज) मा.सौ. सीमा सूर्यवंशी, शिवबा संघटना तालुका सदस्या (वडूज)मा.सौ आशा जाधव उद्योगिनी ,सौ.सपना सत्रे, श्रीमती .वहिदा पठान वीरपत्नी (सातारा) , आदी प्रमुख मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *